निफाड:पिकअपच्या धडकेत ४५ वर्षीय युवकाचा मृत्यू
वेगवान नाशिक/अरूण थोरे
मरळगोई/३१ मार्च २०२३
भरवस फाटा ते कोळपेवाडी मार्गावरील मानोरी खुर्द शिवारात पिकअपच्या धडकेत ४५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
अज्ञात पिकअप चालकाने त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकअप गाडी क्र.एम.एच.१५ एफ व्ही ५३६३ ही भरवस फाटा ते कोळपेवाडी मार्गावर हयगयीने, अविचाराने व रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवुन रस्त्याच्या कडेला उभी असलेली बजाज कंपनीची डिस्कव्हर मोटार सायकल नं.एम.एच.१५ सी एल ८७१८ हीस व तीचेजवळ उभे असेलेले साहेबराव काशिनाथ खरात (वय ४५) वर्ष यांना पाठीमागुन जोराची ठोस मारुन अपघात करुन मरणास तसेच दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत होवुन अपघाताची खबर न देता पळून गेला.
म्हणुन त्याच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गु.र.नं.८६/२०२४ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९, ३३७,३३८,४२७ सह वाहन कलम मोटार कायदा १८४ ,१३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि.भास्कर शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना. मुरडनर करीत आहेत.
अरुण थोरे गेल्या 3 वर्षापासून वेगवान मिडीया मध्ये काम करत असुन,पत्रकारितेची सुरुवात वेगवान सहमुहातुन झाली. सध्या वेगवान नाशिक मध्ये प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. निफाड तालुक्यातून शेती, राजकारण, क्राईम, विषयामध्ये चांगले ज्ञान असून शेतक-यांसाठी लेखन करण्याची आवड.