शेती

नाशिक: पाऊस नसतांना धरणे भरली, ही पुण्याई कोणाची

नाशिक: पाऊस नसतांना धरणे भरली, ही पुण्याई कोणाची

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला :13:सप्टेंबर /येवला तालुक्याचा उत्तर-पूर्व भाग अतिशय दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो.
या भागाला कधी पाणी येईल आणि हा दुष्काळ संपेल असा विचार कोणी स्वप्नात सुद्धा केला नसेल.

१९७२ सालापासून पुणेगाव दरसवाडी कालव्याचे पाणी या भागात येईल असं स्वप्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले होते.
परंतु सलग ५३ वर्षे या भागात पाणी आले नाही.

महत्त्वाचा टप्पा – २००४

ना छगन भुजबळ यांनी येवल्याचं नेतृत्व स्वीकारलं.
या भागाला पाणी येईल अशी आशा निर्माण झाली.

२००७ मध्ये कालव्याचे नव्याने काम पूर्ण झाले.
परंतु प्रत्यक्षात पाणी आलेच नाही, कारण पोहऱ्यात पाणी येण्याचे नियोजन नव्हते.

मांजरपाडा प्रकल्पाचा पर्याय

ना भुजबळ यांनी मंत्रीपदाची ताकद लावून ५७० कोटी रुपये मंजूर करून काम सुरू केले.
२०१९ मध्ये मांजरपाडा बोगद्याचे काम पूर्ण झाले आणि पहिल्यांदा पुणेगावमध्ये पाणी आले.
पण त्यावेळी चाचणीने समजले — १०५ किलोमीटरवर बाळापुर पर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आले तरी ते मुबलक नव्हते.

काँक्रिटीकरण – निर्णय आणि अंमलबजावणी

अडचणी समजून घेऊन ना भुजबळ यांनी प्रशासनाकडून प्रस्ताव मागविला.
२६३ कोटी रुपये काँक्रिटीकरणासाठी मंजूर करून १ वर्षात काम पूर्ण केले.

२०२४ मध्ये डोंगरगावपर्यंत पाणी पोहोचले.
२०२५ पासून कातरणी ते डोंगरगाव पर्यंत पाणी सुरू असून अनेक बंधारे भरले गेले आहेत:

सोमठाणे

विखरणी

कानडी

आडगाव

बाळापूर कासारखेडे

अनकुटे

हडपसावरगाव

नगरसूल

अंगुलगाव

सायगाव

नांदूर

धामोडे गारखेडे

कौटखेडे

अजून काही दिवस पाणी सुरू असल्याने, “कोणी पाणी घेते का पाणी… कुणी पाणी घेता का पाणी…” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

दोन महत्त्वाचे परिणाम

1. पुणेगाव दरसवाडी कालव्याला मांजरपाडा पाण्याचा लाभ मिळाला.

2. पालखेड कालव्याला अतिरिक्त पाणी मिळाल्याने त्याचा प्रवाह सध्या अविरत चालू आहे.

 

कोपरगाव – वैजापूर तालुक्यात देखील पाणी पोहोचले आहे.पाण्याची मागणी पूर्ण झालेली असून शेतकरी आता म्हणत आहेत —
“आता तरी पाणी बंद करा.”
—————————
“मा ना छगनरावजी भुजबळ यांच्या माध्यमातून मागील वर्षी कॉंक्रिटीकरण चे काम अपूर्ण असताना मांजरपाडाचे पाणी येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात आले. अपूर्ण काँक्रिटीकरण कामामुळे पाणी कमी आल्याने पाणी फक्त दाखविण्या पुरतेच आहे का असे राजकीय आरोप केले गेले होते. मात्र यावर्षी काँक्रिटीकरांचे काम पूर्ण झाल्यानंतर मांजरपाडाचे पाणी येवला तालुक्याला पाहीजे तितके उपलब्ध झाले आहे. लाभ क्षेत्रातील सर्व बंधारे भरले गेले असून खऱ्या अर्थाने या भागातील शेती आता बागायती झाली आहे. पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव भुजबळ कालवा हा प्रकल्प पूर्ण झाला असून यशस्वी देखील झाला आहे. हा कालवा पालखेड विभागाकडे हस्तांतरण करण्याच्या सूचना ना भुजबळ यांनी प्रशासनाला केल्या असून लवकरच कालवा पालखेड विभागाकडे हस्तांतरण करण्यात येईल.”

– डॉ. मोहन शेलार, पाणी आंदोलक

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!