नाशिक ग्रामीण

सिन्नर:शिक्षकी पेशाला काळीमा… नामांकित शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापकाचा अल्पवयीन विद्यार्थिनीवर डोळा…

Blame the teaching profession

नामांकित शिक्षण संस्थेच्या शाळेत मुख्याध्यापकाने शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनींसोबत अश्लील गैरवर्तन केल्याची खळबळजनक घटना घडली.सिन्नर तालुक्यातील माळेगाव माध्यमिक विद्यालयात  संतापजनक प्रकार घडला.

हिंदी विषय शिकवणारा मुख्याध्यापक त्या मुलींशी लगट करून त्यांच्याशी अश्लील वर्तन व घाणेरड्या भाषेत बोलत असे. अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नराधम मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवी व नववीतील काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा तसेच अश्लील भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आपल्या पालकांकडे घडलेला प्रकार कथन केल्यानंतर संतप्त पालकांनी शनिवार (दि. १८ जुलै) रोजी शाळेत धडक देत मुख्याध्यापकांविरोधात जोरदार आंदोलन केले. संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत एमआयडीसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली.

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!