लोकल बातम्या

नांदगावात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; 23 हजार विद्यार्थ्यांना दप्तर व वह्यांचा संच देण्याचा उपक्रम

nandgaon news

नांदगावात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; 23 हजार विद्यार्थ्यांना दप्तर व वह्यांचा संच देण्याचा उपक्रम
वेगवान मराठी 18 जुलै 2026

नांदगाव | प्रतिनिधी

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शालेय साहित्य वाटप उपक्रमांतर्गत शनिवारी (दि. 18 जुलै) नांदगाव नगर परिषदेच्या सर्व मराठी शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार सुहास (अण्णा) कांदे व सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना दर्जेदार दप्तर व चार वह्यांचा संच भेट देण्यात आला.

कार्यक्रमात सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत संपूर्ण नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे 23 हजार विद्यार्थ्यांना दर्जेदार दप्तर व चार वह्यांचा संच देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

या प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर अलका मदनराव हिरे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!