Uncategorized

सिन्नर: इंडियाबुल्स परिसरात बिबट्या जेरबंद

सिन्नर:तालुक्यातील मुसळगाव- गुळवंच शिवारात इंडियाबुल्स कंपनीच्या आवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. रविवारी (दि. 19) पहाटेच्या सुमारास सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळाली. इंडियाबुल्स प्रकल्प महाजनको कडे हस्तांतरित केल्यानंतर कामाला वेग आला असून परिसरात सतत आढळणाऱ्या बिबट्यांमुळे कर्मचारी वर्ग भयभयीत झालेले आहेत.

 

वनपरिक्षेत्र अधिकारी सिन्नर प्रादेशिक श्री .पारेकर सर यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी सिन्नर श्री. तानाजी भुजबळ. वनरक्षक सिन्नर श्री.संतोष चव्हाण , वनमजूर श्री.बालम शेख, श्री.मधुकर शिंदे यांच्या समवेत यशस्वीरीत्या कारवाई करण्यात आली. तसेच थर्मल पावर लिमिटेड कंपनीचे मुख्य अभियंता (प्रकल्प आणि नियोजन) श्री अतुल सोनजे सर , C M मिश्रा सर, हरमिंदर सिंग सर, श्रीनिवास पुली , संजय यादव,

येलगुंडे सर ,दुबे सर खैरनार, सूर्यवंशी सर ,प्रदीप शिंदे,कंपनी यांचे सहकार्य लाभले. सदर बिबट जेरबंद पिंजरा मोहदरी वन उद्यान येथे ठेवण्यात आला

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!