नाशिक ग्रामीण

सिन्नर: दोन बांगलादेशी नागरिकांना अटक, सिन्नर पोलिसांची कारवाई

शरद शेळके 

सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नरच्या पांडव नगरी परिसरात एक पुरुष व एक महिला बेकायदेशीr रित्या आपली ओळख लपवून राहत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी पांडव नगरी भागातील श्रुती आपारमेंट येथे जाऊन खात्री केली असता एक पुरुष व एक महिला बेकायदेशीर राहत असल्याची उघडकीस आले.

त्यांची विचारपूस घेतली असता त्यांनी मिलन सुलतान सरदार व वर्षा सुलतान शेख अशी नावे सांगितली. पोलिसांना संशयस्पद वाटल्याने त्यांच्याकडे आधार कार्डची मागणी केली असता त्यांनी उडवडीची उत्तरे दिली . त्यांची झाडाझडती घेऊन पोलीस स्टेशन येथे घेऊन जात विचारपूस केली.

पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी त्यांचे नाव मिलन सुलतान सरदार(३४) व महिलेचे नाव बोर्षा सुलतान मुनीर शेख उर्फ शिवली खानम हबीबउब रहमान रुबेल (33) असल्याचे सांगितले. त्यांच्या झाडझडतमध्ये त्यांच्याकडे भारतामध्ये राहण्यासाठी बनवट आधार कार्ड , लायसन, सिम कार्ड, डेबिट कार्ड मिळून आली,

यातील पुरुष व महिला मुंबई सुरत व एक वर्षापासून सिन्नरमध्ये राहून नाशिक येथे हॉटेलमध्ये स्वयंपाकीचे काम करत होते.

ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी पुरुषांकडे भारतात राहण्यासाठी कुठल्याही प्रकारच परवाना नसल्याने त्यांच्यावर सिन्नर पोलिसांनी कारवाई केली आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सपोनी. प्रेमकुमर दांडेकर, गुन्हे शोध पथकातील अंमलदार विनोद टिळे ,नितीन डावखर, कृष्ण कोकाटे ,प्रशांत शहाणे, आप्पासाहेब काकड, विलास बिडगर, रूपाली डुंबरे यांनी केली.

 

 

 

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!