सिन्नर:इंस्टाग्रामवर तलवारबाजी भोवली, ‘रीलस्टार’वर कारवाई

सिन्नर /वेगवान नेटवर्क
संशयीत विरोधात बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारदार तलवार सोबत घेऊन इंस्टाग्राम वर व्हिडिओ टाकून दहशत पसरवणाऱ्या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंस्टाग्राम वर आकाश रामदास खांडरे (वय 30) भंडारवाडी, सिन्नर येथील तरुणाने दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार हातात घेऊन फोटो पोस्ट केला व रील्स व्हायरल केली . यानंतर या अकाउंट वरील तरुणचा पोलिसांनी शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लोखंडी धारदार तलवार ताब्यात घेतली.
संशयित विरोधात बेकायदेशीर हत्यार बाळगणे मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी व्हिडिओ बनवताचा आणि अटक केल्यानंतरच व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर कोणी असे धाडस करणार नाही.
सदरची कामगिरी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार नितीन डावखर,विनोद टिळे, कृष्णा कोकाटे ,प्रशांत सहाने, आप्पासाहेब काकडे यांनी केली.



