
आनंदनगर नांदगाव येथे वॉटर फिल्टर प्लांटची लोकार्पण
वेगवान मराठी : n
नांदगाव | मंगळावर 11 AUG 2026
नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे या हेतूने नांदगाव शहरात विविध ठिकाणी *आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई कांदे* यांच्या माध्यमातून वॉटर एटीएम बसविण्यात येत आहेत.
आज नांदगाव शहरातील आनंद नगर येथे सदर वॉटर एटीएम चे उद्घाटन *लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे तसेच नांदगाव वकील संघ च्या वतीने ॲड.शेख युनुस यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश शिंदे महिला बालकल्याण सभापती ॲड.विद्याताई कसबे, नांदगाव वकील संघाचे सर्व सन्माननीय वकील , स्थानिक नागरिक, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कैलासनगर नांदगाव
*आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई कांदे* यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील कैलास नगर येथे शालीमार हॉटेल पासून आत मधील सिमेंटचा रस्ता व अंडरग्राउंड गटार च्या कामाची भूमिपूजन *लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते करण्यात आले*
याप्रसंगी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेशजी शिंदे महिला बालकल्याण सभापती ॲड. विद्याताई कसबे शिवसेना व महिला आघाडीचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*जय नांदेश्वरी माता*
नांदगाव |
नांदगाव शहरातील शाकंभरी नदीवर स्थित नांदेश्वरी देवी मंदिराचा सालाबादप्रमाणे आज महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला,
याप्रसंगी *लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे* यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भक्त भाविक शिवसेना युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.
लक्ष्मीनगर नांदगाव
*आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई कांदे* यांच्या माध्यमातून नांदगाव शहरात विविध भागात भूमिगत गटार काँक्रिटीकरण सुरू असून लक्ष्मी नगर येथील भूमिगत गटारीच्या कामाचे भूमिपूजन आज *लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे* यांच्या हस्ते संपन्न झाले
या प्रसंगी नगरसेविका कल्पना वाल्मिक जगताप नगरसेवक वाल्मीक भाऊ टिळेकर शिवसेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकारी स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



