श्रीक्षेत्र बेलेश्वर जळगाव बुद्रुक येथे संत शिरोमणी.नामदेव महाराजांची ६७६ वी पुण्यतिथी उत्साहात संपन्न
Nandgaon news

श्रीक्षेत्र बेलेश्वर जळगाव बुद्रुक येथे संत शिरोमणी.नामदेव महाराजांची ६७६ वी पुण्यतिथी उत्साहात संपन्न
वेगवान मराठी 10 Augऑगस्ट 2026
नांदगाव मारुती जगधने
जळगाव बुद्रुक, ता. नांदगाव : समस्त शिंपी समाजाच्या वतीने वारकरी संप्रदायाचे संतश्रेष्ठ संत नामदेव महाराज यांची पुण्यतिथी जळगाव बुद्रुक,बेलेश्वर ता. नांदगाव (नाशिक) येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली. बेलेश्वर महादेव मंदिर येथील सभामंडपात आयोजित करण्यात आलेल्या या६७६व्या समाधी संजीवन सोहळ्यास नांदगाव तालुक्यातील सर्व शिंपी समाजबांधवांसह जळगाव बु. ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी भागवत धर्माचे आद्य प्रचारक संत श्रेष्ठ संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या भजनाचा आनंद घेत महाप्रसादाच्या भोजनाचा आस्वाद घेतला.. प्रसंगी जळगाव बुद्रुक आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळाने भेलेश्वर परिसर भक्तिमय झाला या कार्यक्रमाचे महाप्रसादाचे आयोजन जळगाव बुद्रुक येथील प्रभाकर निकुंभ यांनी केले होते. यावेळी शिंपी समाजाच्या वतीने पंढरपूर निवासी विठ्ठल रखुमाई ची सुंदर अशी मूर्ती निकुंभ दाम्पत्यास भेट देण्यात आली याप्रसंगी शिंपी समाज नांदगाव तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व शिंपी बांधव नातेवाईक आप्तेष्ट व पंचक्रोशीतील मित्रपरिवार उपस्थित होते



