
जैन समाजाच्या धार्मिक मिरवणुकीने परिसर भक्तिमय
वेगवान मरा ; मारुती जगधने
नांदगाव : जैन समाजाच्या वतीने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सजविलेल्या पालखीची भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या समाजबांधवांनी धार्मिक वातावरणात कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी मार्गावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. धार्मिक जयघोष आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
फोटो कॅप्शन :
जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीतील सहभागी समाजबांधव.



