नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण बैठक
nandgaon news

वेगवान मराठी ; मारुती जगधने
नांदगाव, दि. २६ September.सप्टेंबर २०२६
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची २२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. २६) बाजार समितीचे सभापती एकनाथ सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी बाजार समितीच्या वार्षिक अहवालासह आर्थिक पत्रकांचे वाचन करण्यात आले.
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज संपूर्ण संगणकीकृत पद्धतीने सुरू असून, नांदगाव, बोलठाण व न्यायडोंगरी या तीनही यार्डवर शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शेतमाल विक्रीनंतर शेतकऱ्यांना कार्यालयातच रोख स्वरूपात पेमेंट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. व्यापाऱ्यांसाठी नांदगाव व बोलठाण आवारात नव्याने कॅबिन उभारण्यात आल्या आहेत. तसेच नांदगाव व बोलठाण यार्डवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसविण्यात आले आहेत.
शेतकरी बांधवांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नांदगाव व बोलठाण यार्डवर वॉटर फिल्टर प्लांट बसविण्यात आले आहेत. शेतकरी हिताच्या अशा विविध सुविधा व निर्णय बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत असल्याचे सभापती एकनाथ सदगीर यांनी सांगितले. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास (आण्णा) कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे आणि माजी आमदार अनिलदादा आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे कामकाज सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, बाजार समितीचे संचालक निलेश इप्पर यांना ‘माथाडी भूषण २०२६’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच नांदगाव, बोलठाण व न्यायडोंगरी या तीनही यार्डवर सर्वाधिक शेतमाल विक्री करणाऱ्या टॉप तीन शेतकऱ्यांचा आणि सर्वाधिक शेतमाल खरेदी करणाऱ्या टॉप तीन व्यापाऱ्यांचा संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
नांदगाव यार्डवरील उत्कृष्ट शेतकरी : अशोक पाटील (क्रांतीनगर), लहू कडाळे (माणिकपुंज), चांगदेव पगारे (जातेगाव).
बोलठाण यार्डवरील उत्कृष्ट शेतकरी : भारत तुपे (चिवळी), रविंद्र जाधव (कोळवाडी), बापू शिंदे (वाकला).
न्यायडोंगरी यार्डवरील उत्कृष्ट शेतकरी : दिनेश जाधव (ओढरे), कृष्णा चव्हाण (हातगाव), अनिल सांगळे (रोहिणी).
याचप्रमाणे सर्वाधिक शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला. नांदगाव यार्डवरील आनंद चोरडिया, मुकेश चोरडिया व दीपक कासलीवाल; बोलठाण यार्डवरील रोहित कोठारी, दीपक पवार व साहेबराव नळे; तसेच न्यायडोंगरी यार्डवरील राहुल छाजेड, जोएब तांबोळी व अशोक शेवाळे यांना सभापती, उपसभापती व संचालक मंडळाच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी उपसभापती यज्ञेश कलंत्री, संचालक सतीश बोरसे, अर्जुन पाटील, दर्शन आहेर, जीवन गरुड, पोपट सानप, दीपक मोरे, अनिल सोनवणे, साहेबराव पगार, अनिल वाघ, समाधान पाटील, निलेश इप्पर, बाळासाहेब कवडे, गोकुळ कोठारी, भाऊसाहेब काकळी, सचिव अमोल खैरनार, शिवाजी बच्छाव, अण्णा इप्पर, समाधान चव्हाण, रामभाऊ बागुल, मोहन राठोड, रामदास जगधने, पोपट जाधव, भाऊसाहेब सदगीर, विक्रम फोडसे, दीपक शिंगाडे, दिलीप देशमुख, सहाय्यक सचिव जितेंद्र गरुड आदींसह ग्रामपंचायत व सहकारी सोसायट्यांचे प्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी, हमाल-मापारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाजार समितीचे लेखापाल बाबासाहेब साठे यांनी केले.



