लोकल बातम्या
VJ हायस्कूल परिसरात धोकादायक झाड; विद्युत तारांवर फांद्या कोसळण्याचा धोका
Nandgaon news

VJ हायस्कूल परिसरात धोकादायक झाड; विद्युत तारांवर फांद्या कोसळण्याचा धोका
वेगवान मराठी दि : 10 ghost2026
नांदगाव : शहरातील VJहायस्कूल परिसरात वाळलेल्या व जीर्ण झालेल्या झाडाच्या मोठ्या फांद्या विद्युत तारांच्या अगदी जवळ आल्याने दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते.
झाडाच्या काही फांद्या सुकलेल्या असून जोरदार वारा किंवा पावसामुळे त्या विद्युत तारांवर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच जीवितहानीचीही शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित नगरपालिका व महावितरण विभागाने पाहणी करून धोकादायक फांद्यांची तातडीने छाटणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
छायाचित्र : नांदगाव
संदर्भ : VJहायस्कूल परिसर



