नाशिक ग्रामीण

देवळा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत व्ही.के.डी. विद्यालयाचे दमदार यश

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालय, देवळा येथे झालेल्या देवळा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत भावडे येथील व्ही.के.डी. इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत आठ वजन गटांत प्रथम क्रमांक मिळविला.

१४ वर्षांखालील ५७ किलो वजन गटात पुष्कर ठाकरे व ७५ किलो गटात प्रेम देवरे यांनी, तर १७ वर्षांखालील ८२ किलो गटात योगेश अहिरे व ९२ किलो गटात साई सूर्यवंशी यांनी विजय मिळविला.

१९ वर्षांखालील ६१ किलो गटात आदित्य देवरे, ७९ किलो गटात धनंजय ठाकरे, ८६ किलो गटात दर्शन देवरे आणि ९२ किलो गटात नयन बच्छाव यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

या आठही खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्या खेळाडूंना निलेश भालेराव, चेतना शेवाळे व ऐश्वर्या जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन संजय देवरे, सेक्रेटरी मीना देवरे व प्राचार्य नितीन वाघ यांनी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!