नाशिक ग्रामीण

विद्यार्थ्यांनो, व्यसनांपासून दूर राहून व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करा : पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते

‘नशामुक्ती अभियान’ अंतर्गत मार्गदर्शन

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : महाराष्ट्र शासनाच्या ‘नशामुक्ती अभियान’ अंतर्गत देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. देवळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे दुष्परिणाम, सायबर गुन्ह्यांपासून बचाव आणि ‘डायल ११२’ आपत्कालीन सेवेबाबत यावेळी मार्गदर्शन केले.

गांजा, एमडी (मेफेड्रोन), नशायुक्त गोळ्या व अन्य अमली पदार्थांमुळे होणारे शारीरिक, मानसिक, सामाजिक व आर्थिक नुकसान यावेळी स्पष्ट करण्यात आले. ‘क्षणिक आनंदासाठी सुरू झालेले व्यसन संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते,’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प करावा, असे आवाहन नेहेते यांनी केले.

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विविध ॲप्सचा वापर करताना घ्यावयाची खबरदारी, ऑनलाइन फसवणूक व सायबर धोक्यांपासून बचावाच्या उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच तातडीच्या प्रसंगी डायल ११२ वर संपर्क साधून त्वरित मदत मिळविता येते, याबाबतही पोलीस निरीक्षक नेहेते यांनी माहिती दिली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत शंका निरसन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा तसेच अमली पदार्थांपासून सदैव दूर राहण्याचा सामूहिक संकल्प केला. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, उपप्राचार्य भदाणे, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!