नांदगाव : महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेगवान मराठी : दि 23 जुलै 2026
दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर नीट (NEET) परीक्षा प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीतर्फे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याचा आरोप करण्यात आला असून, अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.
या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर नांदगाव येथे कपिल तेलोरे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बंद पाळण्यात आला. शहरातील व्यापारी, नागरिक आणि विविध संघटनांनी या बंदला चांगला प्रतिसाद दिला. अनेक दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्यात आल्या. बंद शांततेत पार पडला असून, आंदोलनकर्त्यांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची तसेच विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.



