नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी;

Nandgaon news

वेगवान मराठी . दि 23 जुलै 2026

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी;

नांदगाव तालुका मात्र अजूनही प्रतीक्षेत
नाशिक जिल्ह्यात अनेक भागांत मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नद्या-नाले वाहू लागले असून काही धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे.
मात्र नांदगाव तालुक्याचे चित्र यापेक्षा वेगळे आहे. तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक नदी-नाले अजूनही कोरडे असून धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाचे नियोजन अडचणीत आले असून सर्वांच्या नजरा आता दमदार पावसाकडे लागल्या आहेत.
नांदगाव तालुक्यात लवकरच जोरदार पाऊस होऊन धरणे, नदी-नाले भरावेत आणि शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित व्हाव्यात, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!