सिन्नर तालुक्यातील 114 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर… 58 ग्रामपंचायतीमध्ये ” महिलाराज “… !!

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर ,दि : 25 एप्रिल — सिन्नर तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीमध्ये ” महिलाराज “… अंतिम आरक्षण सोडत जाहीर …..
सिन्नर , दि : 25 एप्रिल — नाशिक जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून आरक्षणाचा ड्रॉ काढण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली आहे. तालुक्यातील 114 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर झाले असून त्यात सरपंचासाठी 58 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज ” दिसत आहे. या आरक्षणाचा लाभ तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिलांना होणार आहे. उर्वरित 156 ग्रामपंचायतीमध्ये पुरुष वर्गला संधी मिळणार आहे.
तालुक्यातील सरपंच पदासाठी महिला आरक्षण जाहीर झाले . त्यात या ग्रामपंचायतीचा समावेश आहे… उजनी ( अनुसूचित जाती )महिला. आडवाडी ( अनुसूचित जाती महिला.) सांगवी. ( अनुसूचित जाती. ) डुबेर ( अनुसूचित जाती ), घारणगाव ,डुबेरवाडी, दोडी बु.दातली, खंबाळे ,भरतपुर, पांगरी, शहा, या गावांचा अनुसूचित जमातीसाठी महिला उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.तर औंढेवाडी, हिवरे,पाथरे खु. आणि रामपूर,धोंडविरनगर,ठाणगाव , फुलेनगर,बेलु, सावतामाळी नगर,मलढोण, कोळगाव माळ,सोनांबे, चंद्रपूर,या ग्रामपंचायत साठी ( ना.मा.प्रवर्ग महिला राखीव ) या गावांचा समावेश आहे. तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव गावे — मौजे कुदेंवाडी.आटकवाडे.गोंदे.घोटेवाडी (.आशपुर ) चिंचोली.जायगाव.दहिवाडी.दुसंवाडी.देशवंडी.दोडी खु. नळवाडी, बारा गाव पिंपरी.बोरखिंड.ब्राम्हणवाडे.भोकणी.मर्हळ खु. मर्हळ बु. माळेगांव.मोह. यशवंतनगर ( पिंपरवाडी ). रामनगर.( रामजोशी वाडी. ).वडझिरे.वावी .शिवडे .सुरेगा व .सोनारी.सोमठाणे.हरसुले.आदि ग्रामपंचायत तीनमध्ये महिला राज म्हणुन आपला ठसा उमटवला जाणार आहे. तालुक्यातील ,114 ग्रामपंचायत सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात 58 ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज दिसत आले आहे. या आरक्षणाचा लाभ तालुक्यातील अनेक गावांमध्ये महिलांना होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य समाजाला न्याय मिळाला आहे.अशी भावना व्यक्त केल्या आहेत. परंतु महिला सरपंच हे खरंच या पदासाठी थेट स्वतः किती प्रमाणात कारभार पाहिला जातो हा चर्चेचा विषय आहे. आरक्षणातून महिला सरपंच होते.परतु कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसताना थेट सरपंच होणे हे बहुतांश महिलांना शक्य होते नाही त्यांचा कारभार हा सरपंच पती च पाहतो.. तथापि हीआरक्षणाचा लाभ अनेक गावांमध्ये महिलांना होणार आहे हे नक्की…
