
वेगवान नाशिक/नांदगाव/मनमाड/अविनाश पारखे,दि.22 एप्रिल 25 –
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर मनमाड बसस्थानकासमोर कंटेनर क्रमांक जीजे 27 टीएफ 6985 च्या चाकाखाली वृद्ध महिला सापडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या वृद्ध महिलेच्या डोक्यावरून चाक गेल्याने गंभीर जखमी होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महिलेला उपजिल्हा रुग्णालयात नेले.
वृद्धेची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनेबाबत पोलीस माहिती घेऊन गुन्हा दाखल करत आहेत.पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत.

Shri.Avinash Parkhe
Working with Wegwan Nashik since 2019..As a freelance reporter I always try to clear out the both sides. Always stand for what is right…what is truth…