नाशिक ग्रामीण

पहलगाम हत्याकांडाचा देवळ्यात निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी


वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांच्या अमानुष हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी देवळा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष किशोर आहेर आणि देवदारेश्वर संस्थांचे महंत गणेशानंदपुरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

मंगळवार, २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी देशभरातून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर अमानुषपणे गोळीबार केला. या घटनेत २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, काही जण गंभीर जखमी आहेत. या घटनेमुळे संपूर्ण हिंदू धर्मावर आक्रमण झाल्याची भावना निर्माण झाली आहे. या हत्याकांडाचा देवळा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसेच, या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्या अतिरेक्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात येऊन मृत पावलेल्या बांधवांना न्याय द्यावा, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार कुलकर्णी यांना देण्यात आले. तत्पूर्वी कार्यकर्त्यांनी पाच कंदील चौकात दंडाला काळ्या फिती बांधून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून निदर्शने केली.

यावेळी डॉ. रमणलाल सुराणा, अशोक आहेर, शिवाजी जाधव, समाधान महाजन, किशोर बोरसे, भाऊसाहेब चव्हाण, नाजीम तांबोळी, प्रतीक आहेर, शैलेश गुंजाळ, कमलेश आहेर, मयूर सोनवणे, मानस गुंजाळ, जगदीश शिंदे, सुभाष आहेर, रमेश पगार, चंद्रकांत भामरे, शंकर निकम, सुनील आहेर, योगेश खैरनार, समाधान सोनजे, देविदास वाघ, वैभव आहेर, शेखर आहेर, वैभव निकम, मिलिंद पवार, सुनील पवार, दत्तात्रेय आहेर, अनिल आहेर, किरण निकम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिक ग्रुप Whatsapp GroupJoin
whatsapp channelJoin


बाबा पवार

गेल्या पंधरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, वेगवान न्यूज, कसमादे मीडिया, माय महानगर, नाशिक सिटी न्युज, जागर जनस्थान, इंडिया दर्पण, बी.टी.एल. न्यूज मराठी इत्यादी ठिकाणी पत्रकार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. मुख्यतः राजकारण, शेती, क्राईम, विषयातील बातम्यांमध्ये हातखंडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!