प्रेयसीचा खुन करून प्रियकराची आत्महत्या … जबाबदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर ” मनुष्यवधाचा ” गुन्हा दाखल करा.. महिला कामगार व प्रहार संघटना आक्रमक — !
सिन्नर येथील माळेगांव औद्योगिक वसाहतीतील प्रकार,,,

νवेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दि , २३ एप्रिल — प्रेयसीचा खुन करून प्रियकराची आत्महत्या …. जबाबदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.. महिला कामगार व प्रहार संघटना आक्रमक — !
सिन्नर तालुक्यातील माळेगांव औद्योगिक वसाहतीत हिंदुस्थान युनीलीवर लिमिटेड कंपनी कंपाऊंड च्या आवारात त्याच कंपनीत कामाला असलेल्या शिल्पा अमोल पवार ( वय 28 ) राहणार मापारवाडी या महिलेचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले परंतु कामगार महिला कामावर आली परंतु तिची सुट्टी झाली च नाही का … सुट्टी झाली तर कंपनी च्या गेट वर याची नोंद का नाही.. कामावर आलेला व्यक्तीं ना गेटच्या बाहेर गेली , ना कामावरही हजर… असे असताना कंपनीच्या लक्षात यायला हवे होते.. शिवाय संबंधित व्यक्तीचा मृत्यू होतो तरीही कोणालाही याची कल्पना नसावी ही एक अत्यंत आचार्यकारक गोष्ट आहे.कंपणीच्या या भोंगळ कारभाराचा फटका या कामगारांना बसला आहे. कारण कंपनीने सदर कामगारांची जाण्याची अथवा येण्याची कुठलीच नोंद ठेवली नाही..का ? याचा अर्थ कंपनी सुरक्षा व्यवस्था वा-यावर आहे का ? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित केले जात आहे… कामगार कधी येतात आणि कधी बाहेर जातात या सर्व गोष्टींची नोंद कंपनीच्या सुरक्ष रक्षकां मार्फत ठेवणं गरजेचं असताना कंपनी सुरक्षा व्यवस्था वा-यावर आहे का …? असा सवाल प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.या कंपनी कंपाऊंड च्या आवारात धारधार हत्यार वापरून खुन करण्यात येतो.अतिशय गंभीर घटना घडली असताना चक्क दुसऱ्या दिवसांपर्यंत कंपन्या सुरक्षारक्षक किंवा इतर कोणालाही याची साधी माहितीही नसावी ही एक अत्यंत आचार्यकारक व दुर्दैवी घटना आहे .
.मयत शिल्पा हिचा व याच कंपनीत सुपरवायझर म्हणून कार्यरत असलेले महेंद्र सखाहरी रणशेवरे ( वय ४८ ) राहणार गोंदे या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते परंतु काही कारणाने त्यांच्यांत भांडण झाले असावे व त्या भांडणातुनच या महिलेचा मृत्यू झाला असवा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे… परंतु सदर महिलेचा खून करून सदर इसम आपल्या गावी गोंदे येथे जाऊन शेजारच्या शेतातील लिंबाच्या झाडाला लटकत फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. हे दोघेही कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. या संदर्भात खुन व आत्महत्या चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत. परंतु एवढं सगळं घडलं तेव्हा कंपनी सुरक्षा रक्षक काय झोपा काढत होते काय असा संतप्त सवाल सिन्नर तालुक्यातील सर्व स्तरातून केला जात आहे… या गंभीर घटना घडल्या नंतर तालुक्यातील प्रहार कामगार संघटना व महिला कामगार संघटना यांच्या सह प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास दातार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात सखोल चौकशी करून संबंधित कंपनीला जबाबदार धरले जाऊन त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सिन्नर माळेगाव एमआयडीसी मध्ये महिला कामगार व कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर .. सकाळी महिला नऊला कामावर येते सहाला सुट्टी होती दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडतो याला कारणीभूत कंपनी व्यवस्थापन सुरक्षा व्यवस्थापन आहे म्हणून त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कामगार संघटनेने व महिला संघटनेने केले आहेत .लवकरात लवकर पोलीस अधीक्षक ओपन नाशिक जिल्हा. ग्रामीण पालवे साहेबांची भेट घेऊन मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार पोलिसाने प्रत्येक कंपनीला काही सूचना केल्या पाहिजे किती लोक मध्ये गेले किती लोक बाहेर आले यावर दुर्लक्ष केले जातात वाचमेन हे बिहारी आहे गुन्हेगार आहे ती कुठली सुरक्षा व्यवस्थित पाळत नाही तरी कामगार आयुक्त यांनी व पोलीस आयुक्त यांनी आदेश देऊन कामगारांची सुरक्षा व्यवस्थित ठेवा प्रहार जनहित कामगार संघटनेला रस्त्यावर उतरावे लागेल मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे नाहीतर प्रहार जनशक्ती कामगार संघटना महिला कामगार संघटना तीव्र आंदोलन शोधण्याचा इशारा जनशक्तीचे तालुकाध्यक्ष कैलास दातीर कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश कहांदळ महिला तालुका अध्यक्ष पुष्पा भोसले महिला शहराध्यक्ष संगीता आगळे यांनी पत्रकार द्वारे दिला आहे कैलास दातीर पुष्पा भोसले संगीता आगळे योगेश कांड दत्तात्रय लोंढे चंद्रकांत डावरे अँड विलास खैरनार जिल्हा उपाध्यक्ष वैशाली अनवट संपर्कप्रमुख सुनील जगताप पत्रकार सुनील वाघ कार्याध्यक्ष गणेश थोरात प्रकाश थोरात आशाताई गोसावी कार्याध्यक्ष आदी सह कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे नुकताच हिंदुस्तान या थंड पेय बनवणाऱ्या कंपनीमध्ये आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीमध्ये ही घटना झाली आहे प्रहार जनशक्ती च्या महिला संघटना आक्रमक दिसत आहे…
