
- नांदगाव तहसील कार्यालयावर पिंप्राळे गावकऱ्यांचा मोर्चा
वेगवान मराठी : मारूती जगधने
दिनांक : ३० सप्टेंबर २०२५ .
मोर्चाचे प्रमुख मुद्दे :महिलांसाठी शौचालयाचा अभाव – महिलांना उघड्यावर/शेतात जावे लागते, त्यावेळी स्थानिकांकडून शिवीगाळ व दगडफेक पाण्याची टंचाई – दोन-तीन महिन्यांपासून पिण्याचे पाणी उपलब्ध नाही .वीज पुरवठ्याचा अभाव – गावात अंधार, जीवन विस्कळीत.स्मशानभूमीची मागणी – आदिवासी समाजासाठी स्मशानभूमी नाही.शासकीय योजनांचा अभाव – रेशन कार्ड व जातीचे दाखले नसल्याने नागरिक वंचित.ग्रामपंचायत सदस्याकडून मारहाण व धमक्या – गौतम पवार यांच्याकडून नागरिक व महिलांवर हल्ला, “आंदोलन केल्यास हातपाय तोडू” अशी धमकी.
आंदोलनाचा इशारा :
- न्याय न मिळाल्यास १५ ऑक्टोबर २०२५ पासून बेमुदत बिऱ्हाड आंदोलन करण्यात येईल.
- याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असे निवेदनात नमूद.
मोर्चातील उपस्थिती :
शेखर दादा पगार, सोमनाथ गायकवाड, कृष्णा दुधेकर, उखा सोनवणे, रुषी सुर्यवंशी, अनीता माळी, लता ठाकरे, अक्काबाई सोनवणे, वनिता आगे, लताबाई गायकवाड, सोन्याबाई गोधडे, सिंधुबाई वाघ यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित.



