सिन्नर:औद्योगिक वसाहतीत बिबट्या जेरबंद, कामगारवर्गात धास्ती कायम
वेगवान न्यूज नेटवर्क
सिन्नर:तालुक्यातील मुसळगाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या बेदमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीत बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे.
दिनांक (१२) सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास दूरध्वनी द्वारे मिळालेल्या माहितीनुसार बेदमुथा इंडस्ट्रीज लिमिटेड मुसळगाव कंपनीमध्ये बिबट असल्याची माहिती मिळाली होती. सध्या कंपनी मधील काही भाग बंद स्थितीत असून त्याचाच फायदा घेत बिबट्याने त्या ठिकाणी वास्तव्य केले असावे. जेरबंद करण्यात आलेला बिबट मादी असून अंदाजे वय दीड ते दोन वर्ष वयाचा आहे. बिबट्याला जागेवर वन्यजीव बचाव पथक यांनी ट्रँक्यूलाईझ करून सुरक्षित पणे ताब्यात घेऊन मोहदरी वनउद्यान येथे पुढील कार्यवाही साठी नेण्यात आले.
सदरची कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी भुजबळ, आकाश रुपवते, वनरक्षक संतोष चव्हाण,वनरक्षक मधुकर शिंदे वन्यजीव बचाव पथकाचे रोहित लोणारे , निखिल वैद्य , बेदमुथा कंपनीचे महेश सूर्यवंशी, एकनाथ हरक यांनी केली.
गुळवंच व मुसळगाव परिसरातील एमआयडीसी परिसरात अनेकदा रात्री अपरात्री कामगारांना बिबट्या निदर्शनास येत असतो. गुळवंच एमआयडीसी (इंडियाबुल्स) परिसरात आतापर्यंत पाच बिबटे जरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे.



