नाशिक ग्रामीण

सिन्नर: कार कालव्यात कोसळली,महिलेचा मृत्यू , चौघे जखमी

 

सिन्नर/वेगवान नेटवर्क

तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने रात्रीच्या वेळी  व्हॅगनार कार थेट कालव्यात कोसळली.सोमठाणे जवळून जाणाऱ्या गोदावरी नदीच्या उजव्या कालव्यात जाऊन कोसळली.

कारमध्ये चार प्रवासी होते,त्यातील एका महिलेच्या मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

इगतपुरी  तालुक्यातील हे प्रवासी सोमठाणे गावाकडे येत असताना सोमठाणे जवळील पाटाच्या तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट कालव्यात (पाटात) जाऊन कोसळली. या अपघातात गाडीतील चार प्रवासी जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील सुमन सुखदेव कोरडे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून  उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

शरद शेळके

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील १० वर्षांपासून कार्यरत...ऑनलाईन बातमीदारीत वेगवान न्यूज पोर्टल पासून सुरूवात परिसरातील सामाजिक, राजकीय, कृषी विषयावर अभ्यासपूर्व लिखाण... पोर्टल,लोकल वृत्तपत्र,गावकरी यांसारख्या प्रिंट मीडिया मध्ये काम,सध्या पुढारी आणि वेगवान नेटवर्क माध्यमातून पत्रकारिता सुरूच...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!