नांदुर शिंगोटे ते लोणी महामार्गांवर अपघाताची मालीका सुरूच… सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
नांदुर शिंगोटे ते लोणी महामार्गांवर अपघाताची मालीका सुरूच... सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

वेगवान नाशिक / प्रकाश शेळके
नांदुर शिंगोटे : दि , 19 ऑगस्ट 2025 — नांदूर शिंगोटे ते लोणी मार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सदरच्या रस्त्यावर नांदुर-शिंगोटे ते तळेगाव पर्यंत मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरती मोठ मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे दररोज या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर अपघात घडत आहेत तसेच या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांनाही प्रवेश असल्यामुळे रस्त्याची पूर्ण वाट लागलेली आहे.
ऐन पावसाळ्याच्या दिवसात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अपघातांची मालिका सुरू आहे दररोज या ठिकाणी तीन ते चार अपघात घडत असून खड्ड्यांमुळे अपघात घडत आहे हे खड्डे बुजवणे महत्त्वाच्या असतानाही सार्वजनिक बांधकाम याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे अनेक लोकांना आपले हातपाय गमवावे लागण्याची वेळ आलेली आहे तर काहींना प्राण गमावण्याची वेळ आलेली आहे .
काल सायंकाळी नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर नांदुर-शिंगोटे गावालगत खड्ड्यामुळे एका महिलेला आपला प्राण गमवावा लागलेला आहे सदरची महिला सुशीला शेळके यांना या खड्ड्यामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे यामुळे या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष देऊन हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावे अन्यथा या ठिकाणी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा येथील युवा कार्यकर्ते अरुण शेळके निवृत्ती शेळके यांनी दिला आहे.



