दिंडोरी: या गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना साकडे

वेगवान नाशिक / सागर मोर
दिंडोरी – दिंडोरी तालुक्यातील मौजे चिंचखेड येथील सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांनी गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस पोलिस अधिक्षक नाशिक व वणी पोलिस ठाण्यात याबाबत लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनातील उल्लेख असा चिंचखेड गावाची लोकसंख्या पाच ते सहा हजार असुन हे गाव पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समीती लगत आहे. पिंपळगाव कडील अवैध धंदे करणारांनी चिंचखेड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राजरोसपणे मटक्याचे तीन धंदे अवैधरीत्या सुरु केले आहेत.
चिंचखेड गाव हे धार्मिक वारसा असलेले गाव असुन मटका किंग ,दारु विक्रेते तरुण पिढीस व्यसनाधीन करत आहेत.या भागात खुलेआम मटका ,जुगार ,पत्ते ,दारु असे अवैध व्यवसाय सुरु आहेत तरी गावातील शांतता व सुव्यवस्था राखणेकामी सदर व्यवसाय त्वरीत बंद करावेत अशी लेखी स्वरूपात तक्रार वजा मागणी चिंचखेडच्या सरपंच राधाबाई सताळे व उपसरपंच सुरेखा संधान यांनी केली
गृहमंत्री देवेन्द्र फडणवीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ ,पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटील ,सहाय्यक पोलिस निरीक्षक वणी पोलिस ठाणे व सहाय्यक महसुल अधिकारी , मुख्यमंत्री सचिवालय कक्ष ,जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक



