या तालुक्याला पाण्याची शोकांतिका : छप्पन खेडी योजना वरदान की शाप?
वेगवान मराठीः मारुती जगधने
- नांदगाव [दि 23 ऑगस्ट 2025 ]–उन्हाळा असो . . . हिवाळा असो . . . की पावसाळा असो . . . . नांदगाव शहर व तालुक्यातील नागरिकांना दररोज पाण्याअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. तब्बल 15 ते 20 दिवसांनंतरच पाणी मिळणे, हा आता नांदगावकरांच्या दैनंदिन जीवनातील भाग झाला आहे.
नांदगावकरांसाठी सुरू करण्यात आलेली छप्पन खेडी पाणीपुरवठा योजना कालबाह्य ठरली असून, पावसाळ्यात धरणात मुबलक पाणी साठा असतानाही योग्यवेळी पाणीपुरवठा होत नाही. यामुळे ही योजना नांदगावकरांसाठी वरदान की शाप असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.?
दरम्यान, ग्रामीण भागासाठी 78 खेडी पाणीपुरवठा योजना जवळपास पूर्णत्वास आली आहे. अनेक ठिकाणी नळकनेक्शन दिले गेले असले तरी त्या नळांमधून पाणीच येत नाही. नळ कनेक्शन जोडण्याची घाई मात्र झाली हा प्रकार तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये घडला आहे नळ जोडून दिले फक्त पाण्यापासून ठणठण परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांनाही 15 ते 20 दिवसांच्याछप्पन खेडी योजनेचे अंतरानेच पाणी मिळत आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत दुय्यम पाणी व्यवस्था असलेल्या खाजगी विहिरी ग्रामपंचायतच्या मालकीच्या आहेत त्यांना मुबलक पाणी असताना येथे पाणी वेळेत मिळत नाही आणि पाईपलाईन लिकेज असल्याचे पाईपलाईन फुटल्याचे लाईट नसल्याचे अशी कारण सांगितले जातात आणि गावाला वस्ती वरील रहिवाशांना करदात्यांना पाण्यासाठी टांगणीला धरले जातात .
पाणी वापरासाठी खाजगी विहिरी उपलब्ध असल्या, तरी त्या विहिरींमधील पाणी पुरेशा प्रमाणात असूनही सर्वसामान्यांना दिले जात नाही, असा आरोप नागरिकांमध्ये होत आहे. ग्रामीण भागात देखील पंधरा-वीस दिवसानंतर पाणी सोडले जाते .
नांदगावकरांना दरवर्षी धरणे भरलेली असताना सुद्धा पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामागे पाणी नियोजनाचा ढिसाळपणा व गैरव्यवस्थापन हीच मुख्य कारणे असल्याचे स्पष्ट होत आहे.?
नागरिकांचा सूर एकच :
- “पाणी आहे पण मिळत नाही.”
- “पाईपलाईन आहे पण नळ कोरडे आहेत.”
- “योजना आहे पण तिचा लाभ नाही.”
त्यामुळे आता ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.नान्याड धरण, नाग्या साग्या धरण, ही धरण 100% भरलेले आहेत तसेच 56 खेडी योजनेला पाणीपुरवठा करणारे गिरणा डॅम धरण देखील 70 टक्के पाणी आहे तरी देखील या धरणांमधून पुरेसा पाणीपुरवठा 56 खेड्यांना तथा नांदगावकरांना व ग्रामीण भागातील गावांना होताना दिसत नाही. पावसाळ्यात देखील लोकांना पाण्यासाठी शोधाशोध करावी लागते .पालिका प्रशासन किंवा ग्रामपंचायत प्रशासन हे 56 खेड योजनेला दोष देत असते 56 खेळी योजना स्थानिक प्रशासनाला दोष देत असते अन्यथा वीज पुरवठ्यावर ढकलले जाते अशीही अवस्था तू . . तू . . मै . मै . . ची झाली आहे तेव्हा पाण्याचा मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि नागरिक पाण्यासाठी टाहो फोडतात .तसं म्हणाल तर नांदगाव तालुक्यातील 56 खेडी योजनेखालील नांदगाव शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना ही सवयच लागली की काय त्यामुळे अपवाद वगळता कोणीही याबाबत आवाज उठवत नाही वाचा फोडत नाही .शेजारच्या नळाला पाणी आलं तर आपल्या नळाले किंवा भूमिकेत नागरिक असतात .



