शेती

जिथे नाही पाटाचे पाणी तेथे वरूण राजाची कृपा,,,,, भागवतराव सोनवणे

जिथे नाही पाटाचे पाणी तेथे वरूण राजाची कृपा,,,,, भागवतराव सोनवणे

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव

येवला :दि. 22 ऑगस्ट: तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या दोन दिवसांत झालेल्या चिंब पावसामुळे शेतात जीवंतपणा आला असून खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग यासारख्या खरीप पिकांना आवश्यक ती ओल मिळाली आहे. त्यामुळे कोमेजलेली पिके सुदृढ होऊ लागली असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले आहे.

यंदा पावसाची अनियमितता आणि खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात येईल अशी भीती होती. मात्र तालुक्याच्या उत्तर-पूर्व पट्ट्यात झालेल्या पावसामुळे परिस्थिती काही प्रमाणात सुधारली आहे.

*********
जिथे नाही पाटाचे पाणी, तिथे वरुणराजाचीच कृपा
********
“आमच्या भागात कोणत्याच पाटपाण्याची सोय नाही. आता पाऊस आला… खळगी भरल्या आहेत आणि ओढ्या-नाल्यातून पाणी खळखळून वाहू लागले आहे, त्यामुळं आनंद आहे. लाल कांद्याच्या रोपाचे थोडे नुकसान होत आहे, पण अजूनही नियमित पाऊस आला तर रब्बी हंगाम चांगला जाईल,” :- भागवतराव सोनवणे (संयोजक, शेतकरी कर्जमुक्ती अभियान) यांनी व्यक्त केले.

***************
दमदार पावसाचा लाभ झालेली गावे

रहाडी, खरवंडी, देवदरी, कोळम खुर्द, कोळम बुर्दुक, भारम, वाघाळे, आडसूरेगाव या पाटपाण्याची कोणतीही सोय नसलेल्या गावांत समाधानकारक पाऊस पडल्याने ओढे-नाले वाहू लागले असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
**********

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!