शेती

कांद्याबाबत दिल्लीच्या दरबारात खासदार भगरेंनी मांडली अशी व्यथा

वेगवान नासिक/ सागर मोर
दिंडोरी – संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार भास्कर भगरे यांनी कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सभागृहासमोर मांडत प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना भगरे म्हणाले कि नाशिक जिल्ह्यात देशातील एकूण कांदा उत्पादनाच्या सुमारे 10% कांद्याचे उत्पादन होते
यावर्षी कांद्याचे उत्पादन सरासरीपेक्षा अधिक झाले होते. मात्र, मे महिन्यापासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, द्राक्षे आणि इतर अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या संदर्भात कृषीमंत्र्यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे
एकीकडे अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान होतंय तर दुसरीकडे बाजारात कांद्याला योग्य दर मिळत नाहीये. सध्या कांद्याचे बाजारभाव फक्त 700 ते 800 रुपये क्विंटल आहेत ज्यातून शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही भागत नाहीत. त्यामुळे सरकारने कांद्याला योग्य हमीभाव द्यावा अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली
याचबरोबर, नाफेड आणि एन सी सी एफ या संस्थांमार्फत होणारी कांद्याची खरेदी थेट बाजार समित्यांमधून करावी तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा प्रक्रिया उद्योगांची स्थापना करावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान टाळता येईल आणि त्यांना योग्य मूल्य मिळेल असे सांगितले.

सागर मोर

पत्रकार क्षेत्रात गेल्या 20 वर्षापासून कार्यरत असून सी- न्यूज, दैनिक देशदूत, वेध न्यूज, उत्तर महाराष्ट्र टाईम न्युज, दैनिक लोकनामा या नामवंत न्यूज चैनल व दैनिकातून परिसरातील सामाजिक राजकीय शेतीविषयक असे लिखाण वेगवान न्यूज चैनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!