नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

नाशिक जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर

Nandgaon News

नाशिक जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहीर

वेगवान मराठीः मारुती जगधने
II [दि . 30 सप्टेंबर 2025 ]॥

नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या १५ पंचायत समित्यांच्या सभापतीपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये विशेषत: अनुसूचित जमातींसाठी मोठ्या प्रमाणात जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अनेक ट्रॅक्टर स्वस्तामध्ये विक्री आहे

 घटनाक्रम

  • जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सन २०१८ पासून रखडलेल्या आहेत.
  • सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२५ पर्यंत निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते.
  • मात्र पावसाळा व सण-उत्सवामुळे प्रक्रिया होऊ शकली नाही.
  • त्यामुळे आता या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्यात येणार आहेत.

 आरक्षण निश्चितीबाबत

  • राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) जाहीर केले आहे.
  • पंचायत समिती सभापतीपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.
  • त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, कळवण या भागांत अनुसूचित जमातींची लोकसंख्या अधिक असल्याने त्यांचे सभापतीपद आरक्षित ठेवले गेले आहे.

 निश्चित झालेले आरक्षण (१५ पंचायत समित्या)

  • पेठ – अनुसूचित जमाती महिला
  • त्र्यंबकेश्वर – अनुसूचित जमाती महिला
  • सुरगाणा – अनुसूचित जमाती
  • कळवण – अनुसूचित जमाती
  • दिंडोरी – अनुसूचित जमाती महिला
  • निफाड – अनुसूचित जमाती
  • नाशिक – अनुसूचित जमाती
  • मालेगाव – अनुसूचित जमाती महिला
  • इगतपुरी – अनुसूचित जाती (SC)
  • बागलाण – इतर मागास वर्ग (OBC)
  • येवला – इतर मागास वर्ग (OBC)
  • देवळा – इतर मागास वर्ग (OBC)
  • सिन्नर – सर्वसाधारण (खुला)
  • चांदवड – इतर मागास वर्ग (OBC) महिला
  • नांदगाव – सर्वसाधारण महिला

या निश्चित आरक्षणामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी वेगाने सुरू होणार असून, स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांमध्ये बदल घडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!