महाराष्ट्र,देश

नस्तनपुर येथील श्रावणी शनिवार यात्रेचा सविस्तर वृत्तान्त

Nandgaon news

नस्तनपुर येथील श्रावणी शनिवार यात्रेचा सविस्तर वृत्तान्त (Report)

वेगवान मराठी :

मारुती जगधने दि 22 August2026
​नस्तनपुर (नांदगाव): श्रावण महिन्यानिमित्त नांदगाव तालुक्यातील श्री क्षेत्र नस्तनपुर येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील दुसऱ्या शनिवारी नस्तनपुर येथे लाखो भाविकांनी श्री शनी महाराजांचे दर्शन घेतले.
​दर्शनाची व्यवस्था व नियोजन
भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी नस्तनपुर देवस्थान ट्रस्टच्या वतीने तीन वेगवेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आली होती:
​व्हीआयपी दर्शन: ५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले होते.
​मुखदर्शन: रांगेत उभे राहून थेट दर्शनाची सोय.
​चरणस्पर्श दर्शन: भाविकांसाठी स्वतंत्र रांग.
​भाविकांना मुख्य प्रवेशद्वारापासून ते नस्तनपुर मार्गावरील कमानीपर्यंत सुमारे १ किलोमीटरचा पायी प्रवास करून दर्शन घ्यावे लागले.
​यात्रेतील दुकाने व महाप्रसाद
यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर पूर्णपणे सजला होता. परिसरात खेळणी, पाळणे, मिठाई तसेच विविध वस्तूंची सुमारे १,००० हून अधिक दुकाने थाटण्यात आली होती. तसेच भाविकांसाठी विविध ठिकाणी महाप्रसादाची उत्तम सोय करण्यात आली होती.
​वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची दुरवस्था
न्यायडोंगरी ते मंदिर आणि पिंपरखेड ते मंदिर दरम्यानच्या दीड किलोमीटरच्या रस्त्यावर वाहनांची आणि भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. रस्त्याच्या कडेला दुचाकी व चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
​मात्र, न्यायडोंगरी आणि पिंपरखेड बाजूने नस्तनपुर मंदिराकडे जाणारे रस्ते अत्यंत खाचखळग्यांचे आणि खड्ड्यांचे झाले आहेत. रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याने भाविकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!