या मार्गावरून जाताना सावधान अन्यथा फसाल .
वेगवान मराठी मारुती जगधने
नांदगाव : [ दि 18 सप्टेंबर 2025 ] नांदगाव ते छत्रपती संभाजीनगर मार्गावरील कासारी ते तलवाडे दरम्यानचा रस्ता पुन्हा एकदा प्रवाशांच्या सहनशीलतेची कसोटी पाहत आहे. दि 18 रो जी सकाळपासून या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमध्ये एक कंटेनर अडकून बसल्याने वाहतुकीचा पूर्णपणे ठप्पा झाला आहे. गेल्या अनेक तासांपासून लांबच लांब ट्रक, बस आणि प्रवासी वाहनांची रांग लागलेली आहे.
स्थानिक प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, या मार्गाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती आणखीनच बिकट होते. दररोज प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांना मोठा मानसिक त्रास आणि वेळेचे नुकसान सहन करावे लागत आहे. विशेषतः शेतकरी व व्यापारी वर्गाचे मालवाहतुकीचे मोठे नुकसान होत आहे.
यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत आंदोलना शिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
निष्कर्ष: कासारी–तलवाडे दरम्यानचा रस्ता हा अपघातप्रवण ठिकाणी बदलला असून, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.अनेक दिवसापासून नांदगाव ते संभाजीनगर मार्गावरील कासारी ते तलवाडा दरम्यानचा हा जिल्हा सिमेवरचा रस्ता सातत्याने नादुरुस्त खराब असतो त्यामुळे या रस्त्याला कोणी वालीच उरलेलं नाही यावरती फक्त निवेदन सादर केले जातात तक्रारी केल्या जातात मात्र या निवेदनाची किंवा तक्रारीची कोणीही दखल घेऊन हा प्रश्न मुळासकट मार्गे लावत नाही त्यामुळे या मार्गावरून जाणे वाहनांसाठी चुकीचा मार्ग मानला जातो या मार्गावर सातत्याने वाहनांची नादुरुस्ती होणे आणि वाहतूक ठप्प होणे याला पर्याय मार्ग म्हणून बोलठाण मार्गे लोक छत्रपती संभाजी नगर जात असल्याने बोलठाण मार्गे जाणारा रस्ता सुद्धा याच अवस्थेत झाला आहे अत्यंत निकृष्ट झालाय तो रस्ता देखील एक रस्ता दुरुस्त होत नाही त्यामुळे दुसराही रस्ते खराब होऊ राहिले म्हणून नागरिकांनी प्रवास कोणत्या वाहनाने आणि कोणत्या रस्त्याने करायचा हा एक प्रश्न निरुत्तरी आहे . चाळीसगाव कन्नड घाटातील रस्ता बंद असल्यामुळे या मार्गावरून ही वाहतूक सातत्याने मुंग्यांसारखी रीग लागलेली असते .



