पुढील 48 तासात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात… परतीच्या पाऊस महाराष्ट्रला झोडपणार.. ! या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा —
48 तासात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात... परतीच्या पाऊस महाराष्ट्रला झोडपणार.. ! या तारखेपर्यंत शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा --

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
Puḍhīla 48 tāsāta mēghagarjanēsaha musaḷadhāra śāntalā… Paratīcā pā’ūsa mahārāṣṭrālā jhōḍapaṇāra.. ! Yā tārakhēparyanta sāvadhānatēc..
नाशिक / सिन्नर : दि. 13 सप्टेंबर 2025 — महाराष्ट्रभर सुरू झालेला परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यांत जोरदार हजेरी लावली आहे तर बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यांनी विजेच्या धोका असल्याने या बाबतीत विषेश खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.. पुढील 48 तासात संपूर्ण महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पावसला सुरुवात होणार असुन राज्यातील सर्व ठिकाणी पाणी च पाणी होईल असे संकेत हवामान खात्याने व्यक्त केले आहे त्यामुळे बहुतेक जिल्ह्यातील तालुके तालुक्यात पावसाला जोरदार बॅटिंग सुरू आहे.
परतीच्या या पावसामुळे बळीराजाला संकटाला सामोरं जाण्याची वेळ येऊ शकते कारण हा पाऊस मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घालणार असुन ऐन सोंगणी योग्य आलेल्या पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.सध्या शेतामध्ये सोयाबीन,मका, बाजरी,तुर,हि पिके जोमात असतांनाच परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे तर काही ठिकाणी कांदा लागवडीसाठी मोठी लगबग सुरू आहे परंतु त्यांच्यावर हि ह्या पावसाचा परिणाम होऊ लागला आहे.
साधारणतः हा पाऊस पुढील 48 तासात महाराष्ट्रातील सांगली.जलना.बिड. व पुणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव.धुळे. या पट्ट्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने झोडपले आहे तर दिनांक 13 , 14 ,15, 16,17 या तारखेपर्यंत तुफान पर्जन्यवृष्टी होणार असल्याचे माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितले आहे. यात 16 ,17 या या दिवशी विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याने सर्वंच शेतकऱ्यांनी सावध राहा व सुरक्षित ठिकाणी स्वतःला व जनावरांना ठेवून विजेच्या धोक्यापासून वाचवा अशी माहिती पुणे वेधशाळेने व्यक्त केले आहे. सलग चार दिवस चालणार्या या पावसामुळे जनजीवन विस्कळित होऊन त्याचा परिणाम भाजी पाला व दुधावर होऊ शकतो त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या संदर्भात माहिती दिली जाते आहे.
दिनांक 14 सप्टेंबर पासून ते 17 सप्टेंबर पर्यंत उत्तर महाराष्ट्रातील नाशिक.मालेगाव . अहिल्या नगर या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत सर्वदूर पाऊस हजेरी लावणार असुन काही ठिकाणी विजेचा धोका संभवतो आहे अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे… खबरदारीचा उपाय म्हणून सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याने व्यक्त केले आहे..
संपुर्ण महाराष्ट्रात 17 तारखेपर्यंत तुफान पर्जन्यवृष्टी होणार असल्याचे संकेत हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे या नंतर हा पाऊस निघून जाणार आहे त्यामुळे शेतीच्या कामासाठी उघड होईल असेही त्यांनी सांगितले आहे.सर्वदुर होणाऱ्या या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होईल…



