प्रहार दिव्यांग संघटनेचे चक्का जाम आंदोलन; हजारोंनी महामार्ग ठप्प केला
प्रहार दिव्यांग संघटनेचे चक्का जाम आंदोलन; हजारोंनी महामार्ग ठप्प केला

वेगवान नाशिक /एकनाथ भालेराव
येवला दिनांक :- 24 जुलै 2025
येवला तालुक्यातील अंदरसूल येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दिव्यांग बांधव व शेतकरी वर्गाने संयुक्तपणे राज्य सरकारविरोधात तीव्र चक्का जाम आंदोलन छेडले. नाशिक–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग तब्बल दोन तास ठप्प झाला असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
या आंदोलनात दिव्यांग बांधवांसाठी मासिक ₹6,000 मानधन, संपूर्ण शेतकरी कर्जमाफी, मेंढपाळांचे प्रश्न, तसेच विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली. संपूर्ण शहर दणाणून सोडत आंदोलकांनी “सरकार जागे हो”, “दिव्यांगांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही” अशा घोषणा दिल्या.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आ. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून हे चक्का जाम आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मागण्या मान्य होईपर्यंत विविध स्वरूपाच्या आंदोलनांचा इशाराही देण्यात आला आहे.
आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते:
प्रभाकर धनगे (तालुका अध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना),
शफिक शेख (अध्यक्ष, येवला दिव्यांग संघटना),
सोमनाथ खुरसणे (जिल्हा उपाध्यक्ष, नाशिक),
विकास गरुड, भिका सांगळे, प्रसाद दाणेज, सतीश ठाकरे, अशोक भोरकडे, संदीप लभडे, सचिन शेवाळे, तसेच महिला आघाडीतील प्रतीक्षा कंठाळे, मुक्ताबाई भोसले,कांताबाई भोसले, योगिता कंठाळे, शोभा जाधव, कल्पना गडाख व अनेक महिलांनी च क्का जाम आंदोलन केले.
शेतकरी कर्ज मुक्ती अभियानाचे संयोजक भागवतराव सोनवणे
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल फरताळे, उपाध्यक्ष शंकर गायके, वसंतराव झांबरे, संघटक पांडुरंग शेलार, सरचिटणीस सतीश ठाकरे, मच्छिंद्र जाधव, ज्येष्ठ शेतकरी नेते संतु पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, अरुण जाधव, सचिन आहेर (सरपंच पारेगाव), किसनराव धनगे, डॉ. संकेत शिंदे, महेश काळे, भाऊसाहेब कचरे, योगेश सोनवणे यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते नानासाहेब शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने ठाम पाठिंबा दर्शवला. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असून सरकारने तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनात दिव्यांग बांधवांनी सायकलीसह रस्त्यावर ठिय्या मांडत सरकारच्या धोरणांचा निषेध केला. आंदोलन शांततेत पार पडलं असलं, तरी शासनाने तात्काळ सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर पुढील टप्प्यात राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.



