कोबीवर कोट्यावधी खर्च . केरसाणेतील शेतकऱ्यांनी फिरविला रोटर

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
विरगांव दि.९ऑगस्ट २०२५ :- भाजीपाला उत्पादनात नाशिक जिल्हा आघाडीवर असून परंतु या भाजीपाल्याला कधी भाव मिळतो तर निसर्गाची साथ राहत नाही निसर्गाची साथ राहते तर भाव मिळत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची होते.केरसाणे ता.बागलाण येथील शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून यंदा या पिकावर रोटाव्हेटर फिरविला.यामुळे स्वताच्या कुटुंबाचे श्रम हि वाया गेले व आर्थिक फटका ही बसला .
मे महिन्यांत अवकाळी पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान केले. जमिनीत प्रचंड प्रमाणात बुरशी असल्यामुळे या पिकाला लागवडीपासूनच रोगाचा सामना करावा लागला प्रचंड फवारणी करून शेतकऱ्यांनी हे पीक वाचवण्याचा अतोनात प्रयत्न केला परंतु हे पीक हाती लागले नाही त्यामुळे आर्थिक चणचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा आर्थिक फटका बसला. या पिकामुळे शेतकऱ्यांनी मका पिकाला फाटा देत कोबीच लागवड केली परंतु कोबी पीक गेल्यामुळे तेलही गेले आणि तूपही गेले अशी अवस्था येथील शेतकऱ्यांची झाली.
केरसाणे रविंद्र अहिरे यांनी तीन एकर क्षेत्रात कोबीची लागवड केली.अर्थातच त्यासाठी रोपे, लागवड,खतखाद्य असे सुरुवातीला हजारो रुपयांचा लागवड खर्च केला. नंतर वेळोवेळी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी केली, असा लाखो रुपयांचा खर्च करून शेवटी कोबीवर रोटाव्हेटर फिरविला.त्यामुळे उत्पन्न ते नाही परंतु हातात असणारा पैसाही वाया गेला .
@केरसाणे गावातील शेतकऱ्यांनी कोबीमुळे कोट्यावधी रुपये वाया…
शेती क्षेत्रात अत्यंत श्रम करणारं व उत्पन्न घेणारे बागलाण तालुक्यातील केरसाने हे गाव यंदा कोबी या पिकामुळे कोट्यावधी रुपयाला बुडाले .येथील शेतकऱ्यांनी गतवर्षींपेक्षा यंदा प्रचंड प्रमाणात कोबीची लागवड केली होती उत्पन्न खर्च मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी या पिकावर निंदणी फवारणी करून खर्च केला अखेर तो वाया गेला साधारण सहा ते सात कोटी रुपयांचे उत्पन्न यंदा मिळाले असते असे कोबी उत्पादकांनी सांगितले.
*@कांद्याला भाव नाही शेतकरी चिंताग्रस्त..
गतवर्षाप्रमाणे यंदाही कांद्याला भाव मिळेल या आशने कांदा उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली गेल्या वर्षी कांदा रोपांची अवकाळी पावसाने वाट लावली त्यामुळे पुन्हा प्रयत्नाने बियाणे मिळून शेतकऱ्यांनी कांदा बियाणे टाकले व लागवड केली लागवडीनंतर शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने हे पीक घेतले परंतु काढणीपासूनच कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे आहे तो कांदा आता कांदा चाळीमध्ये खराब होत असल्यामुळे केलेला खर्चही निघणार नाही अशी अवस्था कांदा उत्पादकांची आहे.



