नाशिक ग्रामीण

भावडबारी घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला!

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : नाशिक जिल्ह्यात हवामान खात्याने वर्तवलेला ढगफुटीसदृश आणि अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शहादा-प्रकाशा-विंचूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH ७५२ जी) भावडबारी घाट ७ जुलैपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला होता. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने हा घाट रस्ता आता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार ८ जुलै रोजी रात्री १२ वाजेपासून हा मार्ग अधिकृतपणे सुरू होणार होता, परंतु त्यापूर्वीच हवामान विभागाने दिलेला धोका टाळल्यानं घाटातील बॅरिकेड्स बाजूला सारून वाहनधारकांनी या मार्गावरून प्रवास सुरू केला असून सध्या येथील वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी भावडबारी घाटात डोंगर कट करून रस्ता रुंद करण्यात आला होता. मात्र, पहिल्याच पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याची दुर्घटना घडली होती. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरावरील दगड आणि माती (लूज मटेरियल) मोठ्या प्रमाणावर सैल झाली असून ती कधीही रस्त्यावर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने घाटातील सुमारे १०० मीटरचा अत्यंत धोकादायक पट्टा एका बाजूने पूर्णपणे बंद केला असून, सध्या केवळ दुसऱ्या बाजूने एकेरी (Single Lane) वाहतूक चालवली जात आहे. सध्यातरी घाटातील वाहतूक सुरू झाली असली, तरी वाहनधारकांनी या धोकादायक पट्ट्यातून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!