मन्याड थडी बंधारा प्रथमच डोंगरगाव पोहच कालव्याने भरला; शेतकरी आनंदात
मन्याड थडी बंधारा प्रथमच डोंगरगाव पोहच कालव्याने भरला; शेतकरी आनंदात

वेगवान मराठी: एकनाथ भालेराव
येवला: दि. 26 सप्टेंबर :
येवला तालुक्याच्या पूर्व भागातील अंदरसूल, गारखेडा, पांजरवाडी, गवंडगांव परिसरासाठी वरदान ठरलेला मन्याड थडी बंधारा प्रथमच डोंगरगाव पोहच कालव्याच्या पाण्याने शंभर टक्के भरून समाधानाचा श्वास घेतला आहे. बंधाऱ्याचे पाणी विधिवत पूजन करून शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद साजरा केला.
गेल्या पन्नास वर्षां पासून मांजर पाड्या च्या पाण्याच्या प्रतीक्षेत असलेला मन्याड थडी प्रथमच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याचे चित्र दिसत आहे. नामदार छगन भुजबळ यांच्या योग्य नियोजनामुळे कालवा वेळेत पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरीवर्ग आनंदात आहे. अनेक वर्षे दुष्काळाने होरपळत असलेल्या तालुक्याच्या पूर्व भागात ही ऐतिहासिक घटना घडली आहे.
शेतकऱ्यांनी यावेळी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “शेतीमालाला भाव मिळत नसला तरी पाण्यामुळे शेती विकासाची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.” सतत दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात आजवर कोणताही कालवा नव्हता. परंतु भुजबळ यांच्या प्रयत्नांमुळे डोंगरगाव पोहच कालव्याचे पाणी मन्याड थडी बंधाऱ्यात पोहोचले आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळाले.
पाण्याचे पूजन कार्यक्रमाला योगेश खैरनार, किरण खैरनार, किरण सोनवणे, हरिभाऊ कोल्हे, भगवान देवरे, सागर खैरनार, विशाल खैरनार, किशोर देवरे, गोपीनाथ खैरनार, गणेश कोल्हे, ज्ञानेश्वर कोल्हे, दिगंबर कोल्हे, गणेश भोसले, दत्तू सोनवणे, शिवा सोनवणे, रघुनाथ एंडाईत, बाळासाहेब खैरनार, रायभान खैरनार, महेश सोनवणे, जयराम खैरनार, योगेश ढोले, भोलानाथ कोल्हे, बाळनाथ सोनवणे, दिगंबर सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मन्याड थडी तलावाने आता लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेती विकासासाठी नवी दिशा मिळवून दिली असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



