लोकल बातम्या

या परिषद शाळेतून बदली झालेल्या शिक्षकांना निरोप व नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचे स्वागत

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला/ दिनांक/ 21डिसेंबर /येवला तालुक्यातील ठाणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व दोन शिक्षिका यांची शासन नियमानुसार दुसऱ्या शाळेत बदली झालेल्या शिक्षकांचा  शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभ आणि नव्याने रुजू  झालेल्या शिक्षकांचे स्वागत  समारंभ उत्साहात पार पडला .कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग कोंढरे उपाध्यक्ष गोरख घुसळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देविदास शेळके ,जनार्दन भवर,अर्जुन घुसळे नाट्य कळावंत कृष्णा आदि उपस्थित होते
यावेळी बदली होऊन जात असलेले आदर्श मुख्याध्यापक सुरज झाल्टे ,शिक्षिका रंजना मडके ,सविता शिरसाठ  यांना शाळा, व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तर अंगणवाडी सेविका नलिनी घुसळे यांनीही या शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानित केले .तर येथे नव्याने बदलून आलेले आदर्श मुख्याध्यापक बाबासाहेब बेरगळ ,उपशिक्षक राजेंद्र वाघ निवृत्ती पवार यांचाही यावेळी सन्मान करून स्वागत करण्यात आले.यावेळी बदली झालेले शिक्षक मुख्याध्यापक सुरज झाल्टे  व शिक्षिका रंजना मडके सविता शिरसाठ यांनी आपले मनोगतातून शाळेशी असलेला जिव्हाळा व्यक्त करत ठाणगावच्या मातीचे ऋण आयुष्भर स्मरणात राहील अशी भावनिक साद घातली   यावेळी मुख्याध्यापक बेरगळ यांनी प्रास्तविकातून शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. प्रसंगी अर्जुन घुसळे, जनार्दन भवर, शिक्षण उद्धव वागमारे तसेच विद्यार्थांनी मनोगत व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी अंगणवाडी सेविका नलिनी घुसळे यांनी  आपली सेवा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाची बीजे पेरण्याच्या अनमोल काळ होता आपल्या प्रेमळ स्वभावाने कष्टाळू वृत्तीने आणि मार्गदर्शनाने शाळेला नवे रूप देऊन विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगले संस्कार दिल्याची भावना व्यक्त करून  नव्याने रुजू झालेले शिक्षक बेरगळ ,वाघ पवार यांनीही शाळेचा दर्जा टिकवून ठेवून विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमास विजय भवर, किरण साळवे, कोंढरे, संतोष कांभीरे, दिलीप जाधव, गोरख चव्हाण, सुनील जाधव, विष्णू कोंढरे, साहेबराव शेळके आदींसह ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्ती पवार यांनी केले तर आभार राजेंद्र वाघ यांनी मानले.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!