लोकल बातम्या

श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

Nandgao news

श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी

वेगवान मराठी : मारुती जगधने दि 6 August2026
नांदगाव : श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्ट, आदमापूर (जि. कोल्हापूर) येथे झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करावेत, तसेच ट्रस्ट शासनाच्या ताब्यात घेऊन सरकारी कायदा २०१८ अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी नांदगाव नगरपालिकेचे नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष राजेश भगवान शिंदे यांनी तहसीलदार, नांदगाव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्टमध्ये ७० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणातील संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या देणग्या, ट्रस्टच्या मालकीच्या जमिनी तसेच अन्य मालमत्तेच्या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करून दोषींना शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच, मंदिर ट्रस्टची पारदर्शकता राखण्यासाठी शासनाने ट्रस्ट ताब्यात घेऊन योग्य प्रशासकीय व्यवस्था लागू करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

नांदगाव तालुक्यातील श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्टमधील कथित गैरव्यवहारामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात घडलेल्या कथित चोरी व लुटमार प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ही मागणी जय मल्हार सेना, जय मल्हार मेंढपाळ सेना तसेच धनगर समाज बांधवांच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा, १९५० मधील तरतुदीनुसार श्री संत बाळूमामा मंदिर ट्रस्ट बरखास्त करून शासनाने प्रशासक नेमावा. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिर, पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानप्रमाणे मंदिराचे प्रशासन शासनाच्या नियंत्रणाखाली आणण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनावर राजेश भागवत शिंदे ,गंगाधर करणर , कारभारी शिंदे, बबन सोर, मोनू तांबे, श्रावण कर्नर, विकी सुळ, ईश्वर कोळेकर, नारायण भाऊ तांबे, धोंडीराम तांबे, मनोज तांबे, दीपक भिसे, अंकुश तांब,, मच्छिंद्र शिंदे,
ई.

यांच्यासह धनगर समाज व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!