नाशिक ग्रामीण

देवळा-मालेगाव रोडवर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू


वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : पिंपळगाव ( वा ) शिवारात देवळा मालेगाव रोडवर मोटारसायकल व अर्टिगा यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत दोन जण ठार जागीच झाले असून अपघातास कारणीभूत असलेले चार चाकी वाहन सोडून चालक फरार झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की शुक्रवार दिनांक ७ रोजी सायंकाळी पाच वाजेचा सुमारास पिंपळगाव ( वा.) शिवारातील देवळा मालेगाव रोडवर  देविदास पांडुरंग ठाकरे ( वय २६ )  व कैलाश पुंडलिक देवरे ( वय ५५ )  दोन्ही राहणार धोबीघाट, दहिवड, तालुका देवळा हे मोटारसायकल क्रमांक एम. एच. ४१ बी. एस. ३१५२ वर दहिवड कडून देवळ्याकडे येत असतांना देवळ्याकडून दहिवडकडे जात असलेल्या अर्टिगा क्रमांक एम. एच. ०४ एच. यू . १२८३ यांच्या समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

या अपघातात मोटारसायकल वरील दोघे जागेवरच ठार झाले. तर अपघातास कारणीभूत असलेली अर्टिगा गाडी घटनास्थळी सोडून चालक फरार झाला घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!