नाशिक ग्रामीणशेती

शेतकऱ्यांची धावपळ – दोन दिवसात कागदपत्र जमा करण्याची अट शिथि करण्याची मागणी

Nandgaon News

 

शेतकऱ्यांची धावपळ – दोन दिवसात कागदपत्र जमा करण्याची अट शिथिल करण्याची मागणी

वेगवान मराठी : मारुती जगधने

॥ दि . १ ऑक्टोबर  २0२५ ॥

नांदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी खासदार भास्कर भगरे आणि आमदार सुहास कांदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली. प्रशासनाने संपूर्ण तालुक्यातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत.

दरम्यान, ग्रामपंचायतीमार्फत शंभर गावांमध्ये दवंडी देऊन आणि पत्रक काढून शेतकऱ्यांना फक्त दोन दिवसांत कागदपत्रे जमा करण्याची अट घालण्यात आली आहे. या कागदपत्रांमध्ये –

  • सातबारा उतारा
  • आधारकार्ड झेरॉक्स
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • पिकविमा पावती (असल्यास)
  • स्थळ पंचनामा फॉर्म
  • सामायिक जमिनीसाठी संमतीपत्र
  • जिओटॅग फोटो

या सर्वांचा समावेश आहे.

शेतकऱ्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, “अजून पंचनामे झाले नाहीत, अनेकांना या सूचनेची कल्पनाही नाही, मग फक्त दोन दिवसांत एवढे कागदपत्र कसे जमवायचे?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेतकरी बांधवांचे निवेदन /मागणी

  • “फक्त दोन दिवसांत कागदपत्र जमा करण्याची अट अन्यायकारक आहे.”
  • “शेतकऱ्यांना पुरेसा वेळ द्यावा.”
  • “ही अट तत्काळ शिथिल करून मुदतवाढ द्यावी.”

शेतकरी संघटना आणि नागरिकांनी एकमुखाने अशी मागणी केली आहे की, प्रशासनाने घालून दिलेली अवघड अट तातडीने शिथिल करून शेतकऱ्यांना कागदपत्र जमा करण्यासाठी योग्य मुदत द्यावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!