लोकल बातम्या

या परिसरात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुक

Nandgaon News

या परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान

वेगवान मराठी : मारुती जगधने

[दिनांक 27 सप्टेंबर 2025 ]

मांडवड (ता . नांदगाव) : गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या व अतिवृष्टीमुळे मांडवड, लक्ष्मीनगर व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्याचे, बाजरीचे, भुईमुगाचे तसेच कडधानें भाजीपाला पिक काढणीला आलेले असताना पावसामुळे ती फुगून पूर्णपणे खराब झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी काढणीस ठेवलेले मका-बाजरीचे कणीस पुन्हा उगवणीला लागल्याने उत्पादन वाचवण्याची आशा धुळीस मिळाली आहे.

कांदा पिकालादेखील याचा फटका बसला असून लागवडीसाठी रोपे सततच्या पावसामुळे कुजली आहेत. परिणामी लावलेले लागडीचे कांदे पूर्णपणे खराब झाले आहेत.

शेतकऱ्यांची मागणी आहे की शासनाने तातडीने पंचनामे करून पिकविमा मंजूर करून दिलासा द्यावा. “हातात आलेले पीक पावसामुळे डोळ्यासमोर नष्ट होत आहे, शासनाने मदत न केल्यास मोठ्या संकटात सापडू” अशी हाक शेतकरी व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या मागण्या :

खराब झालेल्या कांदा व इतर पिकांचे तातडीने पंचनामे करावेत.

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व पिकविमा मिळावा.

स्थानिक शेतकरी योगेश सोनवणे यांचे म्हणणे :
“हातात आलेले पीक सततच्या पावसामुळे डोळ्यांदेखत खराब होत आहे. शासनाने पंचनामे करून पिकविमा मंजूर करावा ही आमची मागणी आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!