नाशिक ग्रामीणमहाराष्ट्र,देश

अतिवृष्टी नुकसानभरपाईवर टीका: ‘मदत नव्हे चेष्टा’?

Nandgaon News .

अतिवृष्टी नुकसानभरपाईवर टीका: ‘मदत नव्हे चेष्टा’?

शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

वेगवान मराठी : मारुती जगधने

[दि 25 सप्टेंबर 2025 ]

​राज्यात  अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीवर तीव्र टीका होत आहे. या मदतीच्या रकमेबद्दल आणि पीकविम्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याचे यातून स्पष्ट होते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री माजी मंत्री यांच्यावर शेतकऱ्यांकडून नाराजीचा शोरूम उठलायमंत्री महोदय म्हणतात जास्तीत जास्त मदत करू परंतु ते मदत निश्चित करत नसल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी वाढतच आहे .

नुकसानभरपाईचे स्वरूप आणि आक्षेप:

  • मदतीची रक्कम: शासनाने अतिवृष्टी ग्रस्तांसाठी प्रति हेक्टरी ₹८,५०० इतकी मदत जाहीर केली आहे ?
  • टीकेचा मुद्दा: ही मदत अपुरी आणि फसवणूक करणारी असल्याचे सांगण्यात आले आहे. एका हेक्टरमध्ये साधारणपणे १०० गुंठे असतात. त्यानुसार, ही रक्कम प्रति गुंठा फक्त ₹८५ इतकी होते.

पीक विमा नाकारला जाण्याची भीती:

  • ​या वृत्तांतानुसार, ‘स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Heavy Rain)’ हा पीकविम्यासाठीचा महत्त्वाचा ‘ट्रिगर’ (Trigger) वगळण्यात आला आहे.
  • ​हा ‘ट्रिगर’ वगळल्यामुळे, शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी पीक विमा (Crop Insurance) मिळण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.
  • शासनाने

​शेतकऱ्यांनी जाहीर केलेल्या मदतीला ‘मदत नव्हे चेष्टा’ असे संबोधत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे? अत्यल्प नुकसानभरपाई आणि पीक विम्यापासून वंचित राहिल्यामुळे शेतकऱ्यांची निराशा या यातून प्रकर्षाने दिसून येते .विरोधी पक्षातील पदाधिकारी यांनी नेते यांनी देखील शासनावरती या संदर्भात नाराजी व्यक्त करत जाहीर टीका केलेले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात दिवाळीपूर्वी शासन शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारे सहकार्य करतात हे वेळच ठरवेल .अतिवृष्टी मध्ये कोणाचे कुटुंब प्रमुख होऊन गेले कोणाची जनावर येऊन गेली कुणाची शेती वाहून गेली काहींच्या बागा उध्वस्त झाल्या अनेकांचे पिकं उध्वस्त झाले राहायला जागा उरली नाही सर्वच बाजूने पाणी आणि चिखलच आहे अशी परिस्थिती निर्माण झाली असताना शासन या शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत करते यावर बरेच अवलंबून आहे .

दरम्यान राज्य सरकारच्या मदती संदर्भात टिका होत आहे परंतु आता केंद्राकडून राज्यातील अतिवृष्टी झालेल्या बाधित शेतकऱ्यांना कशाप्रकारे मदत मिळते याकडे देखील आता लक्ष लागून आहे .देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी कुठली मदत जाहीर करता याकडे देखील राज्याचे लक्ष लागले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!