नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान . फक्त 3 मंडळां चा समावेश
Nandgaon News
नांदगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान . फक्त 3 मंडळां चा समावेश
वेगवान मराठी : मारुती जगधने
[दिः 2 4 सप्टेंबर 2025 ]
नांदगाव तालुक्यातील 101 गावांना या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली काही भागांमध्ये ढगफुटी देखील झाली नदी नाले भरून वाहत आहे शेती पिकांमध्ये पाणी वाहत आहे खरिपाची सर्वच पीक पाण्याखाली आहे अशा परिस्थितीमध्ये नांदगाव तालुक्यातील फक्त तीन मंडळांना अतिवृष्टीचा पहिल्या टप्प्यामध्ये समावेश झालेला आहे तालुक्यातील या तीन मंडळांना संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी जाऊन पंचनामे करून तात्काळ सादर करावे असे पत्र शासनाकडून प्राप्त झालेले आहे
नांदगाव ( जि. नाशिक) │ तालुक्यातील वेहळगाव, जातेगाव आणि न्यायडोंगरी महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची नोंद झाली आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नांदगाव यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भातील पत्र कृषी विभागामार्फत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यांना पाठवण्यात आले आहे. आदेशानुसार, संयुक्त समितीने गावनिहाय, पिकांनिहाय आणि शेतकरीनिहाय नुकसानीची माहिती गोळा करून पंचनामे करावेत. तसेच झालेल्या नुकसानीचे क्षेत्रफळ व टक्केवारीची माहिती देऊन पंचनामे संयुक्त स्वाक्षरीसह सादर करावेत, असे निर्देश दिले आहेत.
या पत्रावर तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी आणि तहसीलदार नांदगाव यांची स्वाक्षरी असून, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी प्रशासन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तातडीने पंचनामे करण्याच्या आदेश पत्रकात म्हटले आहे .
दरम्यान नांदगाव कृषी विभागाकडून तालुक्यातील पीक पाहणी व अन्य नुकसानीचा अहवाल अद्याप मिळू शकलेला नाही .मात्र कृषी विभागाला प्राप्त झालेल्या पत्रानुसार सदरवृत्त प्रसिद्ध करण्यात आलेला आहे .
इतर गावी का डावण्यात आले असे प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून उमटू लागले आहेत
प्रतिक्रियाः १
तालुक्यातील आठही मंडळात अतिवृष्टीने शेतीपिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाने फक्त तीन मंडळात पंचनाम्याचे आदेश दिले आहेत,राहिलेल्या पाच मंडळांना डावलण्यामागे काय निकष लावले आहेत त्याचा खुलासा तालुका प्रशासनाने करावा,तसेच २३ सप्टेंबर रोजी पंचनाम्याचे आदेश जारी केल्यावरही कर्मचाऱ्यांअभावी अनेक गावात पंचनाम्यांना सुरुवात झाली नाही,तर काही गावात कर्मचारी उडवाउडवीचे उत्तरे देत टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत, गावपातळीवरील नेमलेल्या प्रशासकिय यंत्रणांनी विनाकारण अडवणूक न करता झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी.
महेंद्र बोरसे
तालुकाध्यक्ष,नांदगाव ( राष्ट्रवादी शरद पवार गट)
प्रतिक्रिया : 2
नांदगाव तालुक्यात एकूण आठ महसूल मंडळ आहेत त्यापैकी तीन महसूल मंडळांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याने सदर महसूल मंडळ मध्ये पंचनामे करण्याच्या सूचना सदर पत्रानुसार दिलेले आहे :
[नांदगाव तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाळे ]



