नाशिक ग्रामीण

गोल्डन अवर सायबर मदत संकल्पनेतुन टेलिग्राम टास्क फ्रॉड मधील ९,८०,००० हजार रू. तक्रारदारास परत मिळवुन देण्यात यश ग्रामीण सायबर पोलीसांची कामगिरी

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दि.८ सप्टें २०२५ :- मा.पोलीस अधीक्षक, बाळासाहेब पाटील सो, मा. अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली सायबर फ्रॉड झालेली रक्कम तात्काळ थांबविण्याकरीता गोल्डन अवर संकल्पना निर्माण करून अंमलात आणण्यात आली आहे.
त्या अंतर्गत तक्रारदार श्री. भावेश शांतीलाल धाडीवाल वय ३५ व्यवसाय व्यापार रा पिंपळगाव बं ता निफाड जि नाशिक यांना दि १०/०७/२०२५ रोजी सायबर गुन्हेगाराने टेलिग्राम वरील Amazone 8 जि या ग्रुप मध्ये अॅड करून प्रॉडक्ट प्रमोशन केल्यास कॅश बॅक मिळेल. असे प्रलोभन दाखवुन वेगवेगळे खात्यामध्ये एकुण १६,७८,००० /- रू ट्रान्सफर करावयास लावुन तक्रारदाराची आर्थिक फसवणुक केल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी लागलीच सायबर पोलीस स्टेशन ना ग्रा येथे धाव घेतली. सायबर पोलीसांनी लागलीच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेवुन तक्रारदार यांची ऑनलाईन तक्रार नोदवुन घेतल्यामुळे तक्रारदार यांचे फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी ९,८०,००० हजार रक्कम लागलीच गोठविण्यात येवुन तक्रारदारास मा. कोर्टाचे आदेशान्वये परत मिळवुन दिले आहे.
सायबर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण पोलीस निरीक्षक नागेश मोहीते, पो.उ.नि वाघमोडे, मपोहवा १५८७ सुवर्णा आहिरे, पो अंम आकाश आंबोरे, यांनी लागलीच प्रकरणाची गंभीरता लक्षात घेवुन तक्रारदार यांची ऑनलाईन तक्रार नोंदवुन घेतल्यामुळे तक्रारदार यांचे फसवणुक झालेल्या रक्कमेपैकी ९,८०,००० हजार रक्कम लागलीच गोठविण्यात आली. व मा कोर्टाचे आदेशान्वये तक्रारदार यांना परत मिळवुन दिले आहे.

नागरिकांना आवाहन :-
सायबर पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण यांचेव्दारे जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपण अनोळखी फोन कॉल्सवर विश्वास ठेवून आपल्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती अनोळखी व्यक्तीस देउ नये. कोणतीही बँक अशा प्रकारची माहिती फोनद्वारे विचारत नाही. बँक खात्याविषयी माहितीकरीता संबंधीत बँकेच्या शाखेत जाउन खात्री करावी. तसेच फोनवर पाठविण्यात आलेल्या अनोळखी व लिंक विषयी माहिती नसल्यास क्लिक करू नये. आपल्या नावे कोणते पार्सल आले आहे. किंवा मनी लाँड्रींग असे आहे. अशाबाबत कोणताही फोन आल्यास विश्वास ठेवु नये Digital arrest बाबत Cyber police station किंवा नजीकच्या पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा तसेच आपली गोपणीय माहीती (बँक खाते, ओ टी पी) देवु नये तसेच कोणत्याही अनोळखी व्यक्ती, स्किम, गुंतवणुकीचे ऑनलाईन अॅप मध्ये जास्त परताव्याच्या आमीषापाई गुंतवणुक करू नये. आपल्या बरोबर अशी कोणत्याही प्रकारची फसवणुक झाल्यास लागलीच जवळील पोलीस स्टेशनला किंवा सायबर पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. अथवा सायबर हेल्प लाईन क्रमांक १९३०/१९४५ तसेच सायबर काईम पोर्टल cybercrime.gov.in यावर तक्रार नोंदवावी –
सायबर पोलिस स्टेशन क्रमांक फोन नं.०२५३-२२०००४०८ पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामीण,
ग्रामीण पोलिस मुख्यालय आडगाव, नाशिक पिन ४२२००३, दुर्ध्वनी क्र.०२५३-२३०९७१०
ई मेल-cybercrime.nr@mahapolice.gov.in

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!