
वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव
येवला :दिनांक :21 ऑगस्ट 2025
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत येवल्यात उभारण्यात येणारे सौर ऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून कोळम (बुर्दुक) पिंपळखुटे (बुद्रुक) व उंदीरवाडी येथील प्रकल्प लवकरच सुरु होत असून पुर्व भागातील 5000 शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
*************
शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणार
“कोळम बुर्दुक, पिंपळखुटे बुद्रुक व उंदीरवाडी येथील हे प्रकल्प स्थानिक शेतकऱ्यांना दिवसा स्थिर, स्वस्त आणि पर्यावरणपूरक वीजपुरवठा सुनिश्चित करून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे उद्दिष्ट पूर्ण करण्यास हातभार लावतील :- मंत्री छगन भुजबळ
*****************
“दिवसा सलग वीज मिळाल्याने वर्षांनुवर्षे अंधारात पाणी भरणाऱ्या शेतकऱ्यांना विजेच्या रूपाने खरा शाश्वत विकास बघायला मिळणार आहेत. वन्य जीव, सर्प दंश असे प्रकार कमी होणार असून शेतकरी सुरक्षित शेती करू शकतील..शिवाय ही वीज पर्यावरण पूरक असल्याने प्रदूषण कमी होणार आहे.
– भागवतराव सोनवणे,
संयोजक, कर्ज मुक्ती अभियान येवला..
ठिकाणनिहाय प्रकल्पांचे तपशील :
कोळम बुर्दुक (8 MW) – या प्रकल्पाचा थेट लाभ 1709 शेतकऱ्यांना होणार असून परिसरातील शेतीला दिवसा भरवशाची वीज मिळणार आहे.
पिंपळखुटे (बुद्रुक) – येथील 8 MW प्रकल्पामुळे 2000 शेतकरी ग्राहकांना फायदा होईल. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सुमारे ६ महिने लागणार असून याचा लाभ अंदरसूल शिवारातील ग्राहकांनाही मिळेल.
उंदीरवाडी (4 MW) – येथील सौर प्रकल्प कोटमगाव कृषी फिडरला जोडण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.
********
योजनेचे फायदे :
दिवसा उपलब्ध होणाऱ्या वीजेमुळे कृषी उत्पादकता वाढणार
महिलांचा शेतीतील सहभाग वाढणार
महावितरणची वीजगळती कमी होणार



