नाशिक ग्रामीण

आराई येथील लष्कर जवान मोहन आहिरे यांना विरगती प्राप्त, ऑपरेशन सिंदुर मध्ये देशसेवा, उद्या शासकीय इतमानात अंत्यसंस्कार

आराई येथील लष्कर जवान मोहन आहिरे याना विरगती प्राप्त

वेगवान नाशिक /तुषार रौंदळ

विरगांव ,ता.२१ऑगस्ट२०२५ :- आराई(ता.बागलाण) येथील लष्करात असलेले जवान मोहन आहिरे याना वीरगती प्राप्त झाली आहे ,त्याचे पार्थिव शुक्रवारी (दि.२२)रोजी मुळ गावी आणण्यात येत असून शासकीय इतमाने दुपारी १२वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .

आराई येथील प्रतिष्ठित शेतकरी एकनाथ आहिरे यांचे पुत्र मोहन आहिरे भारतीय आर्मी दलात २००२ च्या रॅकच्या हवालदार पदावर कार्यरत होते .ऑपरेशन सिंदूर मोहिमेत लेह लडाख येथे देशसेवा बजावत असतांना प्रतिकूल हवामानात अचानक आजारी पडल्यामुळे आर्मी दलाच्या रूग्णालयात गेल्या काही दिवसांपासून मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांना  पुणे येथे आर्मी दलाच्या रूग्णालयात  दाखल करण्यात आले होते. काल रात्री ९ वाजता उपचारादरम्यान अचानक त्याची तब्येत बिघडल्याने मृत्यूशी झुंज देत असताना प्राणज्योत मालवली त्याच्या अवेळी जाण्याची बातमी समजतात बागलाण तालुका व संपूर्ण आराई गावावर शोककळा पसरली,मोहन याच्या पच्छात त्याची पत्नी प्राजक्ता ,मुलगा शुभम , मुलगी प्राची व सृष्टी ,वडील व भाऊ असा परिवार आहे या घटनेने आराई गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!