महाराष्ट्र,देश

बाजार समिती आवारात कांदा खरेदीला येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवा ; आ. डॉ. राहुल आहेर यांचे पणन मंत्र्यांना साकडे

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : केंद्र शासनाने नाफेड (NAFED) आणि एन.सी.सी.एफ. (NCCF) मार्फत महाराष्ट्रासाठी २ लाख टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले असून, त्यानुसार खरेदी प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार ही कांदा खरेदी थेट ‘कृषी उत्पन्न बाजार समिती’च्या आवारातच व्हावी, अशी सक्त सूचना करण्यात आली आहे. मात्र, यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी तातडीने सोडवून खरेदी प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दौलतराव आहेर यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार डॉ. राहुल आहेर यांनी पत्रात नमूद केले आहे की, बाजार समिती आवारात कांदा खरेदी सुरू करण्यासाठी सध्या प्रमुख दोन अडचणी येत आहेत:
१.तात्पुरता परवाना देणे: ज्या संस्थेमार्फत कांदा खरेदी करण्यात येणार आहे, त्यांना बाजार समितीचा परवाना आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित संस्थेला बाजार समितीने तातडीने तात्पुरता परवाना मंजूर करावा.
२.फी माफी मिळणे: परवाना प्राप्त संस्थेला लागणारी बाजार समितीची फी माफ करण्यात यावी.

“या दोन्ही प्रमुख अडचणी सोडवल्यास शेतकऱ्यांना त्यांचा कांदा अत्यंत पारदर्शकपणे थेट बाजार समितीमध्ये विकता येईल आणि त्यांना योग्य न्याय मिळेल.” या पार्श्वभूमीवर, नाफेड व एन.सी.सी.एफ. मार्फत होणारी कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच सुरळीतपणे पार पडण्यासाठी पणन मंत्र्यांनी आपल्या स्तरावरून योग्य ते आदेश जारी करावेत, अशी आग्रही विनंती आमदार डॉ. आहेर यांनी या निवेदनातून केली आहे.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!