नाशिक ग्रामीण

भेसळखोरांचे धाबे दनानले.मुंडे यांच्या कारवाईचे स्वागत

Nandgaon news

भेसळखोरांचे धाबे दनानले.मुंडे यांच्या कारवाईचे स्वागत

वेगवान मराठी:मारुती जगधने दिनांक 4 जून 2026

महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळखोरांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ करणाऱ्यांवर करडी नजर ठेवली असून, राज्यभरात तपासणी आणि कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
फळे पिकविताना वापरले जाणारे विषारी औषधे , औषधे, अन्नपदार्थ तसेच पेढा, पनीर, मलई खवा गुलाब जामुन आणि विविध मिठाईच्या पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष पथके सक्रिय केली आहेत. सण-उत्सवांच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळखोरांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या मोहिमेमुळे भेसळखोरांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असून, अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनीही संशयास्पद अन्नपदार्थ किंवा औषधांची माहिती प्रशासनाला देऊन या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!