नाशिक ग्रामीण

भऊर येथे सेवा संकल्प अभियान, पोषण माह समारोप व वेलकम मेळावा उत्साहात

वेगवान नाशिक / बाबा पवार

देवळा : एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प देवळा अंतर्गत खामखेडा बीटमधील ग्रामपंचायत भऊरच्या अंगणवाडी केंद्र भऊर-बोदाडी येथे सेवा संकल्प अभियान, पोषण माह समारोप तसेच नवचेतना व आधारशिला उपक्रमांतर्गत वेलकम मेळावा उत्साहात संपन्न झाला.

बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीकांत पवार व पर्यवेक्षिका श्रीमती छाया अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात पोषण आहार प्रदर्शन, नवचेतना व आधारशिला शैक्षणिक साहित्याचे विविध स्टॉल, टाकाऊपासून टिकाऊ साहित्य निर्मिती प्रदर्शन, टी.एच.आर. पाककृती स्पर्धा, पोषण गुढी, पोषण मटका, ‘जंकफूड राक्षस’, बाहुली घर, बाळाचे पहिले हजार दिवस, विभागाच्या विविध योजनांचे प्रदर्शन, पोषण आरती व रांगोळी प्रदर्शन आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ व मातांना महिला व बालविकास विभागाच्या विविध योजना तसेच कौटुंबिक हिंसाचार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा गौरव करण्यात आला.

बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीकांत पवार, पर्यवेक्षिका छाया अहिरे तसेच तालुका संरक्षण अधिकारी रोहन अमृतकर यांनी विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले. भऊर ग्रामविकास समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार बाबा पवार, डॉ. जे. डी. पवार संस्थेचे अध्यक्ष दीपक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. अंगणवाडी सेविका रत्ना पवार यांनी सूत्रसंचालन केले, तर जि.प. शिक्षिका वृषाली देसले यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य दादा मोरे, रवींद्र पवार, ग्रामस्थ कृष्णा पवार, सुधाकर पवार, दीपक पवार, दिनेश पवार, नितीन पवार, पर्यवेक्षिका अर्चना साबळे, राधिका कुवर, मुख्याध्यापिका रत्नमाला देवरे, गट समन्वयक निखिल गायकवाड, रोजगार सेवक रमेश पवार, खामखेडा बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, बचत गट प्रतिनिधी, आरोग्य कर्मचारी, माता व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका रत्ना पवार, शोभा गरुड, अनिता आहेर, हेमलता पाटील, अनिता बोरसे, सीमा निरभवने, मंदाकिनी आहेर तसेच मदतनीस कविता पवार, शितल निकम, दिपाली जाधव, रेखा माळी, मनीषा गरुड, प्रियंका पगारे यांनी विशेष परिश्रम घेतले.

बाबा पवार

गेल्या १७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. दैनिक देशदूत, लोकमत, आपलं महानगर, नवराष्ट्र, स्वतंत्र भारत आदी दैनिक, AM न्युज TV चॅनल, नाशिक सिटी न्युज आदी इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेगवान न्यूज तालुका प्रतिनिधी म्हणून कामाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, शैक्षणिक, शेती, यशोगाथा, आदी विषयावर विशेष लिखाणाची आवड.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!