नांदगाव येवला रोड राजापूर येथे इरटीका कारचा थरारक…
चालत्या इरटीका कार ने घेतला पेट कार पूर्ण जळून खाक..
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही..
: नांदगाव येवला रोड राजापूर येथे चालत्या इरटीका कारचा थरारक समोर आले इरटीका कार पूर्ण जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही
नांदगाव येवला रोड राजापूर येथील ममदापुर फॉरेस्ट च्या आवारात ही घटना घडली.
दि. ०२ जून मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एका चालत्या इरटीका कार ने पेट घेतला.
कार चालकाने प्रसंगत दाखवत वेळेवर कार जागीच थांबवून मधी बसलेल्या प्रवासि यांना खाली उतरवले आणि लांब घेऊन गेले नंतर कार ने असा पेट घेतला कि पूर्ण कार जळून खाक झाली जर वेळेवर कार थांबली नसती तर मोठा अनर्थ झाला असता.
इरटीका येवला रोड वरून नांदगाव मार्गे मालेगाव चालली होती राजापूरच्या पुढे ममदापुर फॉरेस्ट प्रवेशद्वारच्या समोरच ही घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच येवला अग्निशामक दल दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली.
कारला आग कश्यामुळे लागली अद्याप स्पष्ट झाले नाही.
चालकाने वेळेवर कार थांबवून प्रवासी व स्वतःचा जीव वाचवला?



